News Flash

मुव्ही रिव्ह्यू: कौल मनाचा

समाजातील असंख्य घटकांचा, अनेक सामाजिक प्रश्नांचा वेध मराठी चित्रपटांनी घेतला आहे. याच पठडीतील आजच्या काळातील वास्तवाचा वेध घेणारा ‘कौल मनाचा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘रेड बेरी एन्टरटेंन्मेंट’ प्रस्तुत ‘श्री सदिच्छा फिल्म्स’ निर्मित ‘कौल मनाचा’ या चित्रपटात बालमनाचा वेध घेण्यात आला आहे. फ्रेश लूक, दमदार स्टारकास्ट आणि वेगळ्या धाटणीचं कथासूत्र या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. राजेश पाटील, विठ्ठल रूपनवर व नरशी वासानी निर्मित ‘कौल मनाचा’ या चित्रपटात अमृतासहित राजेश शृंगारपुरे, समीर धर्माधिकारी, मिलिंद गुणाजी, विजय चव्हाण, जयवंत वाडकर, विजय गोखले, वर्षा दांदळे, कमलेश सावंत, श्वेता पेंडसे, आशुतोष गायकवाड, गिरीजा प्रभू, निनाद तांबडे, गणेश सोनावणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X