पाकिस्तानचे समर्थन करणारे वक्तव्य केल्याबद्दल कन्नड अभिनेत्री दिव्या स्पंदन उर्फ रम्या यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानची तुलना नरकाशी केली होती. मात्र, रम्याने आपण पर्रिकर यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले होते. पाकिस्तान हा नरक नसून एक चांगला देश आहे. पर्रिकर […]