उत्तराखंडच्या चमोली जोशीमठ परिसरात एका अस्वलाने दहशत निर्माण केली होती. त्याने काही स्थानिकांवर हल्लेही केले होते. यानंतर वन अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी अस्वलाने अधिकाऱ्यांवर हल्ला केला असता वन अधिकाऱ्यांनी त्याला ठार केले.