‘सत्ता असली की पाय जमिनीवर ठेवायचे असतात’ असे मत शरद पवारांनी जालना येथे मांडले. शरद पवार हे जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद दौऱ्यावर होते. याठिकाणी त्यांनी नगराध्यक्ष सुरेखा लहाने यांच्या घरी भेट दिली. लोकांना संबोधित करताना पवार म्हणाले की, सत्ता येते आणि जाते. सत्ता असली की पाय जमिनीवर ठेवायचे असतात. नाहीतर नेतेपदाला अर्थ नसतो. पुढे पवार म्हणाले की, परदेशात कापूस पाठवणे बंद केल्याने कापसाच्या किमती घसरल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे कापूस आणि सोयाबीनचा प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारकडे मांडणार असल्याचे म्हणत लवकरच आपण यांना लवकरच जागा दाखवू असा इशाराही पवार यांनी सरकारला दिला आहे.