Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकरांनी सांगितला भीषण अपघाताचा थरारक अनुभव
ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास गोवर्धनवाडी तेर रस्त्यावर व्यायाम व धावण्यासाठी गेले असताना ८ जून रोजी सकाळी एका अपघातातून ते थोडक्यात बचावले. भरधाव येणाऱ्या टिप्पर त्यांच्या अंगावर येणार होता. मात्र ओमराजे यांनी प्रसंगावधान त्यातून आपला बचाव केला. या अघाताचा संपूर्ण प्रसंग ओमराजे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितला