दैनिक सामनाच्या ‘अजितदादांचा विकास’ या मथळ्याखाली छापलेल्या अग्रलेखावरून अजित पवार गट आक्रमक झाला आहे. मात्र आपण अजित पवारांवर खालच्या भाषेत टीका केलेली नाही, असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. मी डरपोक नाही आहे, मला धमक्या देऊ नका, असं म्हणत त्यांनी अजित पवार गटाला थेट इशारा दिला आहे. मुंबई ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.