मुंबईतील आझाद मैदानात शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडतोय . गेल्या अनेक दिवसांपासून या मेळाव्याची चर्चा होती. यावेळी मुख्यमंत्री एखनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी, समाजवादी पक्षांशी युती या मुद्द्यांवरून ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल चढवला. गर्व से कहो हम समाजवादी है, गर्व से कहो हम काँग्रेसी है, गर्व से कहो हम हिंदुत्वविरोधी है, अशी वक्तव्य शिवतीर्थावरून होताहेत, असा घणाघातही त्यांनी केला.