आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरवात झालीये. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. “धर्मवीर आनंद दिघेंना त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही ओळखतो. पहिल्या ‘धर्मवीर’चित्रपटात अनेक दृश्य खोट्या कथानकावर आधारित होते” असा आरोप करत “पहिल्या चित्रपटात त्यांचं निधन झालेलं तुम्ही दाखवलं आहे, तर मग दुसऱ्या भागात काय दाखवणार?” असा सवाल राऊतांनी विचारलाय.