Sanjay Raut on Modi:”साडेसाती गेली आहे, पनवती देखील जाईल”; पुण्यात संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
“आपल्या देशाला, महाराष्ट्राला आणि शिवसेनेला लागलेली पनवती २०२४ नंतर शंभर टक्के जाईल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता साडेसाती गेली आहे आणि पनवती देखील जाईल”, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील जाहीर मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.