मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेली अंतिम मुदत २४ डिसेंबरला संपली. मात्र आंदोलन अद्याप संपलेलं नाही. मनोज जरांगे २० जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार आहेत. राज्यातील मराठा समाजाला त्यांनी मुंबईत धडकण्याचं आवाहन केलं आहे. या आंदोलनावर जरांगे ठाम असून त्यांनी आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे.