कमळाबाईच्या पदरा खाली लपा आणि निवडणूक लढा, असा प्रस्ताव भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अजित पवार गट आणि शिंदे गटाला दिला आहे. नड्डा हे मुंबई दौऱ्यावर आले होते त्यावेळी हा प्रस्ताव दिल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.