शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करावा, असा अर्ज आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात केला आहे. या घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही आरोप झालेले होते. आर्थिक गुन्हे विभागाच्या या निर्णयानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या मोठ्या नेत्यांवर टीकास्र डागलंय. ते आज (२ मार्च) सकाळी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.