उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीतून पंतप्रधानपदाचा चेहरा असतील का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी खासदार संजय राऊतांना विचारला. त्यावर त्यांनी का असू नये? महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली तर आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे, असं सूचक विधान संजय राऊतांनी केलं आहे. अनेक वर्ष शरद पवार यांच्याकडे आशेने पाहिलं जात होतं. मात्र अंतर्गत राजकारणामुळे त्यांना संधी मिळाली नाही, असंही राऊत यावेळी म्हणाले.