कल्याणीनगर अपघात प्रकरणातील तपास अधिकारी यांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास बसले आहेत. तसंच अगरवाल कुटुंबाने अनेक गुन्हे करून पोलिसांच्या मदतीने ते पाचवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.