Sujay Vikhe Patil On Shirdi Sai Sansthan : शिर्डीतील साई संस्थानच्या प्रसादालयामध्ये दिल्या जाणाऱ्या मोफत जेवणावरून राजकारण पेटताना दिसतंय. प्रसादालयातील जेवणासाठी पैसे घ्या, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. ही मागणी करताना सुजय विखे यांनी वापरलेल्या ‘भिकारी’ या शब्दांवर आता राज्यभरातून टीका होतेय. नेमकं सुजय विखे पाटील काय म्हणाले आणि त्यावर आता कोणी काय टीका केलीये, तसेच टीकेनंतर सुजय यांची भूमिका काय आहे याविषयी सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत