पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना आधीच अटक केली होती. पण सासरा आणि दीर फरार होते. फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना पोलिसांनी पहाटे अटक केली, त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास सुरु आहे, दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी कस्पटे कुटुंबासोबत संवाद साधला त्यावेळी दोषींना सोडलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया महाजनांनी दिली