Rupali Chakankar on Vaishnavi Hagawane Dowry Harassment Case Updates : वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिची मोठी जाऊ आणि हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी हगवणे हिने अनेक माध्यमांना प्रतिक्रिया देत कुटुंबातील सदस्यांचे काळे चेहरे समोर आणले. दरम्यान, याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल झाली होती. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सविस्तर माहिती आहे. राज्य महिला आयोगाकडे वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे आणि जाऊ मयुरी हगवणे या दोघींनी एकमेकांविरोधात ६ नोव्हेंबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.