परभणीतील मनसेचे उमेदवार विनोद दुधगावकर यांनी मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना शिवसेनेत प्रवेश केला असून, परभणीतील शिवसेनेचे उमेदवार डॉ. राहुल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर मनसेच्या उमेदवाराने शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मनसेपुढील अडचणीत भर पडली आहे. परभणीमध्ये एमआयएमची ताकद रोखण्यासाठीच आपण शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे विनोद दुधगावकर यांनी स्पष्ट केले. खासदार संजय जाधव यांच्या कार्यालयात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. अशाप्रकारे मतदानाच्या अवघे काही तास अगोदर एका पक्षाच्या उमेदवाराने थेट दुसऱया पक्षात प्रवेश करण्याची यंदाच्या निवडणुकीतील कदाचित ही पहिलीच घटना ठरली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2014 रोजी प्रकाशित
परभणीत मनसेच्या उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश
परभणीतील मनसेचे उमेदवार विनोद दुधगावकर यांनी मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना शिवसेनेत प्रवेश केला
First published on: 14-10-2014 at 04:35 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns candidate from parbhani entered in shivsena