जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये स्वबळावर लढणार – मायावती

जम्मू-काश्मीर आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे बसपाच्या नेत्या मायावती यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीर आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे बसपाच्या नेत्या मायावती यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले. महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुकाही पक्षाने स्वबळावर लढल्या होत्या.
महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुकांमध्ये बसपाची कामगिरी निराशाजनक झाली, असे विचारले असता मायावती म्हणाल्या की, अन्य पक्षांनाही विशेष कामगिरी करता आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जनतेने अनुकूलता दर्शविली, असेही त्या म्हणाल्या.
परदेशातील काळा पैसा आणि गंगा शुद्धीकरण या प्रश्नांवरूनही मायावती यांनी मोदी यांच्यावर टीका केली. महागाई नियंत्रणात ठेवण्यातही सरकार अपयशी ठरल्याचे त्या म्हणाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bsp to go it alone in jk jharkhand assembly polls mayawati

ताज्या बातम्या