मनसेच्या वाहतूक सेनेचा अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी राज ठाकरे यांच्या मनमानी कारभारावर चौफेर टीका करत मनसेला सोडचिठ्ठी दिली. मनसेच्या स्थापनेपासून हाजी अराफत शेख यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या असून प्रामुख्याने मुस्लिम तरुणांनाही मोठय़ा प्रमाणात मनसेकडे वळविले होते.
गेल्या वर्षी राज ठाकरे यांनी मनसेच्या वाहतूक सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बरखास्त केल्यानंतरही हाजी अराफत यांनाच अध्यक्ष म्हणून कायम ठेवले नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वाहतूक सेनेची पदे भरण्यात यावी अशी वारंवार मागणी करूनही ती पदे भरण्यात आलीच नाहीत. आज पक्षात आमदारांना व सरचिटणीसांना काही किंमत नाही तेथे कार्यकर्त्यांना कोण विचारणार, अशी खंत व्यक्त करत, कोणताच पर्याय न राहिल्यामुळे आपण मनसे सोडत असल्याचे हाजी अराफत शेख यानी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2014 रोजी प्रकाशित
वाहतूक सेना अध्यक्षाचा मनसेला रामराम!
मनसेच्या वाहतूक सेनेचा अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी राज ठाकरे यांच्या मनमानी कारभारावर चौफेर टीका करत मनसेला सोडचिठ्ठी दिली.
First published on: 27-08-2014 at 02:00 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns activist haji arafat shaikh resigns from party