महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना इतरांची नक्कल करण्याशिवाय दुसरे काहीच जमत नाही. त्यांना नकला करणे इतकेच आवडत असेल तर, त्यांनी चित्रपटसृष्टीत यावे असा खोचक टोला रिपब्लिकन पक्षाची सदस्य आणि चित्रपट अभिनेत्री राखी सावंतने राज यांना लगावला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवलेंना देऊ केलेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या ऑफरची राज यांनी मुंबईतील जाहीर सभेत खिल्ली उडवली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना राखी सावंत म्हणाली की, राज यांनी अशाप्रकारे आठवलेंवर टीका करणे योग्य नाही. राज ठाकरेंना नक्कल करण्याशिवाय दुसरे काहीच येत नाही. त्यांना नकला करणे इतकेच आवडत असेल तर, त्यांची राजकारणात काहीच गरज नाही. राज यांनी चित्रपटसृष्टीत यावे आणि नकला करुन दाखवाव्यात असेही ती पुढे म्हणाली.
याआधी राज यांनी रामदास आठवलेंना उध्दव यांनी दिलेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवरून आठवलेंच्या घरच्यांनाही हसू आले असेल अशी खिल्ली उडवत ज्या पक्षाला इतकी वर्षे काम करुन पक्षाची निशाणी निश्चित करता आली नाही. ते नेतृत्व काय करणार? असा सवालही राज यांनी उपस्थित केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2014 रोजी प्रकाशित
राज ठाकरेंना नकला करण्याशिवाय दुसरे काहीच येत नाही- राखी सावंत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना इतरांची नक्कल करण्याशिवाय दुसरे काहीच जमत नाही. त्यांना नकला करणे इतकेच आवडत असेल तर, त्यांनी चित्रपटसृष्टीत यावे असा खोचक टोला रिपब्लिकन पक्षाची सदस्य आणि चित्रपट अभिनेत्री राखी सावंतने राज यांना लगावला आहे.

First published on: 01-10-2014 at 05:55 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant criticises raj thackeray