राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत अनेक वर्षांनंतर सर्वच पक्षांचे उमेदवार समोर आले असून, बहुरंगी लढती होत आहेत. त्यात प्रादेशिक पक्षांना लोक मर्यादित ठेवताना काँग्रेसचा सामना भाजपशीच होईल. असा राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा काढताना, गतिमान प्रशासनासाठी एकाच पक्षाची एकहाती सत्ता गरजेची असून, महाराष्ट्रातील जनता काँग्रेसला स्पष्ट बहुमत देईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.कराड दक्षिणमधून मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.