15 August 2020

News Flash

भुजबळांविषयी सुप्त नाराजी

पुतण्या, मुलगा यांची राजकीय सोय लावून देण्याची राज्याच्या राजकारणात प्रथाच पडली आहे. त्यातूनच नाशिकची जहागिरी छगन भुजबळ यांनी पुतणे समीर यांच्याकडे सोपविली.

| September 6, 2017 02:20 pm

लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले
तडफदार आणि लाडके उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी
येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारा मध्ये..

पुतण्या, मुलगा यांची राजकीय सोय लावून देण्याची राज्याच्या राजकारणात प्रथाच पडली आहे. त्यातूनच नाशिकची जहागिरी छगन भुजबळ यांनी पुतणे समीर यांच्याकडे सोपविली. समीर तुमच्या झोळीत टाकत आहे, असे भावनिक आवाहनही केले. नाशिककरांनी समीरला निवडून दिले. अर्थात तिरंगी लढतीचा त्यांना लाभ झाला होता. छगन भुजबळ यांचे भरभक्कम पाठबळ लाभल्याने खासदारांनी मतदारसंघांमध्ये कामांचा धडाका लावला. सार्वजनिक बांधकाम खाते भुजबळ यांच्याकडेच असल्याने या खात्याचे नाशिकवर जरा जास्तच प्रेम. यामुळे लोकांच्या नजरेस भरेल अशी कामे झाली. तरीही समीर भुजबळ हे मतदारांच्या मनात भरलेले दिसत नाहीत. समीर यांच्याबद्दल नाशिककरांच्या मनात काही प्रमाणात तिडीक असल्याचे सुप्तपणे जाणवते.
यामुळेच बहुधा आगामी निवडणुकीत समीर यांच्याऐवजी त्यांचे काका छगन भुजबळ यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी भूमिका राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आणि मोठय़ा भुजबळांनी ती तात्काळ मान्य केली. परिणामी नाशिकमधील लहानसहान कार्यक्रमांमध्ये छगन भुजबळ हे हजेरी लावू लागले आहेत. काका लोकसभेत तर पुतणे येवल्यात असे चित्र राहणार आहे. नाशिकची जहागिरी राखण्याचे भुजबळांसमोर मोठे आव्हान आहे.

लोकसभा मतदारसंघ :नाशिक
विद्यमान खासदार : समीर भुजबळ
(राष्ट्रवादी काँग्रेस)
मागील निकाल : मनसेचे उमेदवार
हेमंत गोडसे यांचा पराभव

जनसंपर्क
नाशिकमधील भुजबळ फार्म हे खासदारांना भेटण्याचे हेच ठिकाण. सवड मिळेल त्याप्रमाणे व सुटीच्या दिवशी नाशिक मुक्कामी. विशिष्ट पदाधिकाऱ्यांच्या कोंडाळ्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते तसेच नागरिकांना खासदारांपर्यंत पोहोचण्याची वाट अवघड.
मतदारसंघातील कामगिरी :
*नाशिक पालिका हद्दीतील पुणे आणि औरंगाबाद महामार्गाचे रुंदीकरण करण्यावर भर. पालिका हद्दीतील द्वारका ते दत्त चौक या साडेपाच किलोमीटर रस्त्याच्या सहापदरीकरणास तसेच नाशिक ते सिन्नर रस्ता चौपदरीकरणास केंद्राकडून मंजुरी मिळविण्यात यश.
*दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या ठिकाणांहून मुंबईला जाणारी विमाने नाशिकला थांबविण्यासाठी प्रयत्न.
*पिंपळगाव ते गोंदे हा ६० किलोमीटरचा टप्पा सहापदरी केला आहे. याअंतर्गत नाशिक शहरातून जाणाऱ्या ६.१ किलोमीटरच्या उड्डाणपुलाची निर्मिती.
*केंद्रीय मार्ग निधीमधून घोटीपासून भंडारदरा, सिन्नर, त्र्यंबकेश्वर तसेच सिन्नर-शिर्डी, सायखेडा-ओझर, नाशिक-औरंगाबाद या रस्ता सुधारणांची कामे पूर्ण.
*सिन्नरमधील गोंदेश्वर, इगतपुरीतील टाकेद, घाटनदेवी, कपिलधारा तीर्थस्थान यांच्या विकासासाठी निधीची तरतूद.

लोकसभेतील कामगिरी
*सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न : २८६ (तारांकित : १९, अतारांकित : २६७)
*रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेत ५ वेळा, तर सर्वसाधारण अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग

लोकसभेत विचारलेले महत्त्वाचे प्रश्न :
*धरणांतील पाण्याची घसरणारी पातळी. भटक्या विमुक्त आणि ओबीसी विद्यार्थ्यांंना दहावीनंतर दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची अंमलबजावणी. हज यात्रेकरूंचा कोटा.
*जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या भरपाईचे स्वरुप, खासगी-सार्वजनिक भागीदारीतून उभारले जाणारे रेल्वे प्रकल्प ’पर्यावरण व ग्रामीण पर्यटन योजना
*धरणांतील पाण्याची घसरणारी पातळी. भटक्या विमुक्त आणि ओबीसी विद्यार्थ्यांंना दहावीनंतर दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची अंमलबजावणी. हज यात्रेकरूंचा कोटा.
*जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या भरपाईचे स्वरुप, खासगी-सार्वजनिक भागीदारीतून उभारले जाणारे रेल्वे प्रकल्प ’पर्यावरण व ग्रामीण पर्यटन योजना

नाशिक-पुणे लोहमार्गाची घोषणा महत्त्वपूर्ण
नाशिक-पुणे लोहमार्गाची घोषणा ही खासदारकीच्या कारकीर्दीमधील सर्वात महत्त्वाची बाब होय. हा प्रश्न दीर्घकाळपासून रखडलेला होता. मागील अर्थसंकल्पात झालेल्या या घोषणेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी अलीकडेच रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. या कामास लवकरच सुरुवात होईल. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत रुपये १८९९.६४ कोटी आहे. महाराष्ट्राने यापैकी निम्मा वाटा म्हणजे रुपये ९५० कोटी देण्याचे मान्य केले आहे. स्थानिक विकास निधीतून आतापर्यंत ९४ कोटींची कामे सुचविण्यात आली आहेत. या माध्यमातून १०० टक्के निधीची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
समीर भुजबळ
काम दुसऱ्याचे.. श्रेय यांचे!
नाशिक-पुणे महामार्ग रुंदीकरणास मंजुरी मिळवून आणण्याचे श्रेय निश्चितच खासदारांना द्यावे लागेल. परंतु आधीच कामाचे आदेश निघालेल्या उड्डाणपूल निर्मितीचे श्रेय ते कसे घेऊ शकतात ? खासदार निधीच्या वापराव्यतिरिक्त सिंचन, उद्योग, रोजगार अशा कामांसाठी निधी मिळविण्यात त्यांना अपयश आले आहे. केंद्राच्या किती योजना त्यांनी मतदारसंघात आणल्या? महामार्गाच्या रुंदीकरणातही वडपे ते पिंपळगावपर्यंतच्या महामार्ग रुंदीकरणास आधीच मंजुरी मिळाली होती.
हेमंत गोडसे.

 

पुढील रविवारी
पुणे, लातूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2013 4:00 am

Web Title: an account of mp sameer not happy with uncle chhagan bhujbal
टॅग Mp
Next Stories
1 अनाथांची माय हरपली!
2 कोणत्या अंगभूत सुखासाठी मुली डान्स बारमध्ये नाचतात?
3 अलविदा पद्मिनी
Just Now!
X