हर्षद कशाळकर

रायगड जिल्ह्यातील गुळसूंदे येथील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी विविधरंगी कलिंगडाची लागवड केली आहे. यात पिवळया रंगाचे आवरण आणि आतून लाल असलेल्या, हिरव्या रंगाचे आवरण, पण आत पिवळा गर असलेल्या कलिंगडांचा समावेश आहे. या कलिंगडांना महानगरात आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये मोठी मागणी असते. त्यामुळे चांगला दरही मिळतो. ही बाब लक्षात घेऊन गाडगीळ यांनी आपल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर विविधरंगी कलिंगड लागवड केली आहे.

uran marathi news, gaon dev yatra
उरण परिसरात गावदेवांच्या जत्रा सुरू
Imd issued heatwave warning in mumbai on sunday and monday
मुंबईत रविवार, सोमवार उष्णतेच्या लाटेचा इशारा; ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांनाही इशारा
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना

जिल्ह्यात खरिपाच्या भातकापणीनंतर शेतकरी कलिंगडाचे पीक घेतात. या कलिंगडांना रायगडसह ठाणे, मुंबईतून मोठी मागणी असते. पण उत्पादनाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न मर्यादित असते. त्यामुळे गुळसूंदे येथील मिनेश गाडगीळ यांनी यंदा आपल्या शेतात कलिंगडाच्या विविध प्रजातींची लागवड केली आहे. यात जास्त बाजारभाव आणि मागणी असलेल्या विविधरंगी कलिंगडांचा समावेश आहे. सेंद्रीय पद्धतीने त्यांनी या पिकाचे उत्पादन घेतले आहे. ज्यातून कमी खर्चात चांगले उत्पादन त्यांना यंदा मिळाले आहे.   

साधारणपणे शंभर रोपांची त्यांनी या वेळी लागवड केली आहे. यात आवरण पिवळे आणि गर लाल रंगाच्या विशाला प्रजातीचा, आवरण हिरवट काळे आणि गर पिवळा असलेल्या आरोही प्रजातीच्या, तर मस्कमेलन प्रजातीत मोडणाऱ्या कुंदन प्रजातींचा समावेश आहे. चवीला अतिशय गोड आणि आकर्षक रंग असल्याने विविधरंगी कलिंगडांना मोठी मागणी होऊ लागली आहे.  

 या कलिंगडांचा देखभाल खर्च कमी असतो. लागवडीच्या तीन महिन्यांनंतर प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होते. पारंपरिक कलिंगड प्रजातींपेक्षा जास्त उत्पादन मिळते, तारांकित हॉटेलमध्ये त्याला मोठी मागणी असते. त्यामुळे दर चांगला मिळातो, फळमाशीचा अपवाद सोडला, तर पिकावर कीड रोगाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. कीटकनाशकांचा कमी वापर करावा लागतो. सेंद्रीय खतही एकदाच द्यावे लागते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला.  

पनवेल, पेण, अलिबाग, रोहा, माणगाव, सुधागड येथे कलिंगडाची मोठया प्रमाणात लागवड केली जाते. पण पारंपरिक कलिंगड प्रजातींकडे शेतकऱ्यांचा ओढा असतो. त्याऐवजी विविधरंगी कलिंगडाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो, असा विश्वास गाडगीळ यांनी व्यक्त केला आहे. या कलिंगडात बिटा कॅरोटिन आणि अ‍ॅण्टिऑक्सिडंटचे प्रमाण सामान्य कलिंगडाच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ही कलिंगडे जास्त उपयुक्त ठरतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविधरंगी कलिंगडांची लागवड करून पाहावी, असे आवाहन त्यांनी केले.   

meharshad07@gmail.com