एकेकाळी संपूर्ण राज्यात चौथ्या क्रमांकाचे महानगर म्हणून ओळखले गेलेले सोलापूर मोठया प्रमाणावर कापड गिरण्या व सूतगिरण्यांमुळे गिरणगाव म्हणून ओळखले गेले. काही जण याच सोलापूरला उपहासाने खेडयाची उपमा देतात. आज मोदी सरकारच्या कृपेने निकृष्ट दर्जाची का होईना, स्मार्ट सिटी अवतरली तरी सोलापूरला खेडे म्हणण्याची सवय अजूनही कायम आहे. भाजपचे आमदार सुभाष देशमुख हे सोलापूरला अधूनमधून खेडे म्हणूनच संबोधतात. एका कार्यक्रमात त्यांनी सोलापूरला हेच बोल लावले. तेव्हा उपस्थित भाजपचे त्यांचे प्रतिस्पर्धी म्हटले जाणारे आमदार विजय देशमुख यांनी, सुभाषबापू सोलापूरला खेडं का म्हणाले कळले नाही. याच सोलापुरात पूर्वी सोन्याचा धूर निघत होता. सोलापुरी चादरीचे कारखाने प्रसिद्ध होते. शहराचा विकास करणे ही आपण सर्व लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले. स्मार्ट सिटी, शहराभोवती जोडलेले सर्व महामार्गाचे चौपदरीकरण, रेल्वे विकासाचे जाळे, वाढते धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन, वाढता शेती बाजार या गोष्टी पाहिल्या म्हणजे नेमके शहर कोणाला म्हणायचे, असा सवाल एका देशमुखांनी दुसऱ्या देशमुखांना करताना आपल्यातील दुही अद्यापि संपले नसल्याची जणू द्वाहीच फिरविल्याची चर्चा रंगल्याचे कार्यक्रमस्थळी पाहायला मिळाले.

शरद पवार यांना अखेर घराचा ताबा..

शिवेंद्रसिंहराजेंनी शरद पवार यांना एका फोनवर मिळवून दिला म्हाडाच्या घराचा ताबा असं हेडिंग  असलेला  संदेश (मेसेज) साताऱ्यात समाज माध्यमांवर आला आणि सगळयांची तो संदेश वाचण्यासाठी उत्सुकता ताणली गेली.तेव्हा सर्वांच्या लक्षात आले की, सातारा तालुक्यात पवारांची निगडी नावाचे गाव आहे. येथे शरद पवार नावाचे सीमा सुरक्षा दलातील जवान चीन सीमेवर काम करतात. त्यांचे वडील आप्पा पवार हे गिरणी कामगार असल्याने त्यांना म्हाडाचे घर मंजूर झाले होते. त्यांनी या घराचे सर्व सोपस्कार पूर्ण केले होते, मात्र त्यांना घराचा ताबा मिळत नव्हता. यासाठी शरद पवार यांनी सीमा सुरक्षा दलातून चीन सीमेवरून तीस दिवसाची सुट्टी घेतली होती. सुट्टी संपत आली तरी त्यांना  दाद मिळत नव्हती. म्हणून त्यांनी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना फोनवर एक मेसेज केला.  माझे वडील गिरणी कामगार असून त्यांना घर मंजूर झाले आहे. परंतु त्याचा ताबा अजूनपर्यंत त्यांना मिळालेला नाही, ते वयस्कर असल्याने त्यांना नियमितपणे मुंबईला जाणे येणे शक्य नाही, या कामी आपण लक्ष घालून  माझ्या वडिलांना घराचा ताबा मिळवून द्यावा. यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना ताबा मिळवून दिला. मात्र या विषयीचा समाज माध्यमांवर संदेश आला, शिवेंद्रसिंहराजेंनी शरद पवार यांना एका फोनवर मिळवून दिला म्हाडाच्या घराचा ताबा’ यामुळे सगळयांची उत्सुकता ताणली गेली होती. शिवेंद्रराजे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची साथ सोडली असली तरी आपल्या गावातील शरद पवार यांच्या मदतीला आमदार धावून गेले याचीच चर्चा अधिक सुरू झाली.

Taloja, industrial smart city, smart city,
तळोजाची औद्योगिक स्मार्ट सिटीकडे वाटचाल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Wardha, Cheating, government treasury,
वर्धा : चहा, नाश्त्याच्या नावे शासकीय तिजोरीवर डल्ला, गुन्हा दाखल होताच आरोपी अधिकाऱ्याची…
police raid hotel for operating illegal hookah parlour
कोंढव्यातील हुक्का पार्लरवर छापा; माजी गृहराज्य मंत्र्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा
Pune ATS Kondhwa
Pune News : दहशतवाद विरोधी पथकाचा पुण्यातील अवैध टेलिफोन एक्सचेंजवर छापा; सात सीमबॉक्स, तीन हजार सीमकार्डसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
Mumbai Port Trust, Municipal Planning Authority,
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये पालिका नियोजन प्राधिकरण ? लवकरच प्रक्रिया पूर्ण करण्याची पालकमंत्र्यांची घोषणा
Trademark Violation, namesake restaurant, pune,
व्यापार चिन्हाच्या उल्लंघनाचा वाद : पुण्यातील नेमसेक रेस्टॉरंटला बर्गर किंग नाव वापरण्यास तूर्त मज्जाव
rbi launch unified lending interface
कर्जाच्या सुलभ प्रवाहासाठी आता ‘यूएलआय’; ‘यूपीआय’च्या धर्तीवर रिझर्व्ह बँकेकडून नवीन कर्ज मंच

हेही वाचा >>> दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकऱ्या; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय

राजकीय ईर्षेत अधिकाऱ्यांची कोंडी

पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाने कोल्हापूरकरांची चांगलीच छळवणूक केली आहे. शाश्वत पर्याय म्हणून काळम्मावाडी धरणातून पाणी आणण्याची योजना राबवण्याचे ठरले. आठ – नऊ वर्ष काम सुरू ठेवल्यानंतर या योजनेचे पाणी अलीकडेच कोठे शहरात पोहचले. काम जलद गतीने व्हावे यासाठी आमदार सतेज पाटील यांची कायमची नजर होती. कंत्राटदाराची धरसोड वृत्ती आणि अधिकाऱ्यांची कामचुकार वृत्ती यामुळे काम रखडत राहिले. अशातच पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी महापालिकेत अधिकाऱ्याकडे शेवटच्या टप्प्यात आली. काम जलद गतीने व्हावे यासाठी खाजगीत लोकप्रतिनिधी हिसका दाखवण्याची भाषा बोलू लागले. त्या कटू माऱ्याने बिचारे अधिकारी आणखीनच बिथरून जात राहिले. हे पडद्याआडचे नाटय नुकतेच एका बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी उघड केले. बिचाऱ्याला कितीही बोल घातले तरी काम मात्र वेळेत पूर्ण केले, अशा शब्दांत उघडपणे कौतुक केले. हुरूप आलेले अधिकारीही अडचणींचा पाढा वाचत राहिले. शेवटच्या टप्प्यात रात्र जागवत काम कसे केले हे सांगत राहिले. इतके करूनही सतेज पाटील यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सत्काराला उपस्थित राहिल्याबद्दल दुसरीकडून उद्धार कसा केला गेला हेही सांगून टाकले.

‘आजारी’ यंत्रमानव !

 शहरातील नागरिकांच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य  संस्थेची असते. या जबाबदारीपोटी नागरिकही कररूपी आपला हिस्सा देत असतात. या निधीतूनच अधिकाधिक नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्था करतात. शहरातील अस्वच्छ पाणी वाहून नेण्यासाठी सांगलीतही मोठी जलनिस्सारण व्यवस्था करण्यात आली आहे. या गटारीतून पाण्याबरोबरच प्लॉस्टिकसह  अन्य कचराही वाहत असतो. बऱ्याचवेळा हा कचरा गटारीत तुंबून राहिल्याने गटारी तुंबतात.  मोठ-मोठया गटारीतून तुंबलेला कचरा बाहेर काढण्यासाठी मानवी शक्तीचा वापर करणे तसे धोकादायकच. यावर उपाय म्हणून महापालिकेने यंत्रमानवाचा वापर करण्याचा निर्णय घेऊन दीड वर्षांपूर्वी यंत्रमानवाची खरेदी केली. यासाठी अर्धा कोटींचा निधीही मोजला. याचे प्रात्यक्षिकही यथासांग पार पडले. उद्धाटनानंतर हा यंत्रमानव महापालिकेच्या पेटीत कुलुपबंद झाला आहे. मात्र, वापर न हो ताच, या यंत्रमानवाच्या दुरुस्तीसाठी पुन्हा दहा लाखाचा खर्च प्रस्तावित केल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. म्हणजे‘ ना खाया, ना पिया, ग्लास फोडा, जुर्माना आठ आणा.’

निंबाळकर-मोहिते संघर्षांला जातीपातीचा तडका

माढा लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आणि त्यांना लोकसभेत निवडून पाठविण्यासाठी शिल्पकार ठरलेले ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात पक्षांतर्गत उघड संघर्ष वाढला असताना त्यात जातीपातीचा मुद्दा समोर आला आहे. यात रणजीतसिंह निंबाळकर यांना घेरण्याचा प्रयत्न होत आहे. माळशिरस विधानसभा राखीव मतदारसंघात खासदार निंबाळकर हे कोणत्याही विकास योजनांचे भूमिपूजन वा लोकार्पणाच्या कार्यक्रमात स्वपक्षाचे आमदार राम सातपुते यांना सोबत न घेता विरोधकांना ताकद देतात. सातपुते हे केवळ मागासवर्गीय असल्यामुळे ते निंबाळकर यांना हलक्या दर्जाचे वाटतात का? नवी दिल्लीत त्यांनी मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. परंतु महादेव कोळी समाजाचा त्यांना विसर का पडला? असे प्रश्न मोहिते-पाटील समर्थकच उपस्थित करू लागले आहेत. त्यामुळे निंबाळकर व मोहिते-पाटील यांच्यातील संघर्ष आगामी काळात कोणत्या थराला जाणार? पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास हा संघर्ष का येत नाही, अशी चर्चा माढयाच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. (संकलन – विश्वास पवार, एजाज हुसेन मुजावर, दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे )