Effective method to control snail attack on crop पावसाबरोबर सर्वत्र शेतीच्या कामांची लगबग सुरू होते. मशागती, पेरण्या होतात, पिके जोमाने उभी राहतात. मग याच काळात विविध कीटक आणि किडींचाही प्रादुर्भाव सुरू होतो. या साऱ्यात गेल्या काही वर्षांपासून उभ्या पिकाला शंखी गोगलगायींचा विळखा बसू लागला आहे. या शत्रूपासून पिकाचे कसे संरक्षण करायचे याबद्दल…

लीकडे काही वर्षांत मराठवाड्यासह शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात, बार्शी आणि अक्कलकोटसारख्या भागात खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची लागवड कमालीची वाढली आहे. कमी कालावधीत आणि कमी उत्पादन खर्चात पिकणाऱ्या, शेतकऱ्यांना शाश्वती असलेल्या सोयाबीनचा तोरा वाढला आहे. मराठवाडा, विदर्भात लाखो हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. सोलापूर जिल्ह्यात यंदा सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा झाला आहे. मृग नक्षत्रासह अन्य नक्षत्रांच्या पावसाची पोषक साथ लाभल्यामुळे पेरण्यांचे क्षेत्र वाढले असताना अलीकडे तुलनेने जास्त पाऊस झाल्यामुळे तसेच दूषित, दमट आणि ढगाळ हवामानामुळे शेतात सोयाबीनला चक्री भुंग्यांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यावर कीटकनाशक फवारण्याची लगबग वाढली असताना येत्या काही दिवसांत पाऊस सातत्याने पडत राहिला तर शेतात ओल वाढण्याची आणि त्यातून सोयाबीनला शंखी गोगलगायींचा विळखा बसण्याची भीती आहे. मागील दोन वर्षांपासून मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील अन्य बऱ्याच भागात शंखी गोगलगायींचा नुकसानकारक प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. यंदाच्या वर्षी सुदैवाने आतापर्यंत तरी गोगलगायींचे संकट आले नसले तरी त्याची शक्यता गृहीत धरून त्यावर सामूहिकपणे एकात्मिक उपाययोजना होणे आवश्यक आहे.

Silk worm farming by tribal farmers
Silk Worm Farming : आदिवासी शेतकऱ्यांचा रेशीम शेतीचा प्रयोग
Ratan Tata Pet Dog came to pay him last tribute
मुक्या प्राण्याची माया! रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा…
how to plant grow and care for ginger
Ginger Crop Information : आल्याची लागवड!
Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi: बिगबॉस सारखे शो प्रेक्षकांच्या मानसिकतेशी कसे खेळतात?
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
ratan tata famous quotes
Ratan Tata: “ज्या दिवशी मी स्वत: काही करू शकणार नाही…”, रतन टाटांचे अजरामर शब्द!
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
lok shivar challenges of heavy rain for farmers excessive impact rain on crops
लोक शिवार : अतिवृष्टीचे आव्हान

हेही वाचा >>> लोक शिवार : अतिवृष्टीचे आव्हान

वरकरणी संथ, शांत वाटणारी आणि ‘गोगलगाय अन् पोटात पाय’ या म्हणीचा प्रत्यय अनुभवास येणारी शंखी गोगलगाय बहुभक्षी असून पाचशेपेक्षा अधिक वनस्पतींचा कसा फडशा पाडते, हे लवकर कळूनही येत नाही. सोयाबीनसह पपई, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, तुती, भाजीपाला, फळझाडे आदी वनस्पतींची पाने, फुलांना छिद्र पाडून पाने-फुलांच्या कडा खातात. गोगलगायींचा प्रादुर्भाव केवळ पिकांनाच हानिकारक ठरत नाही तर मानवी शरीरालाही धोकादायक असतो. गोगलगायींच्या नित्य संपर्कातील व्यक्तीला मेंदुज्वरासारखा गंभीर आजार होऊ शकतो. शेतातील वापरात येणारी अवजारे, यंत्रसामुग्री, ट्रॅक्टर-ट्रॉलीसारखी वाहने, जनावरे आदी साधनांमार्फत गोगलगायींचा प्रसार होतो. दुर्दैवाने दोन वर्षांपूर्वी गोगलगायींच्या वाढलेल्या प्रादुर्भावानंतर त्यांच्यावर आळा घालण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सोयाबीनसारख्या रोपावस्थेतील पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून सुमारे ९३ कोटी रुपयांची भरपाई मिळाली होती. त्यावरून शंखी गोगलगायींच्या प्रादुर्भावाचा अंदाज लक्षात येतो.

यंदाच्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीनचे वाढलेले लागवड क्षेत्र विचारात घेता आणि आगामी दिवसांत मोठ्या पावसाची शक्यता लक्षात घेता गोगलगायींचा शिरकाव सोयाबीनच्या शेतात होऊ शकतो. हे गृहीत धरून शंखी गोगलगायींवर नियंत्रण मिळविण्यासाठी, त्यांचा नायनाट करण्यासाठी विविध चार टप्प्यांमध्ये उपाययोजना करता येतात. यासंदर्भात परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. पी. आर. झंवर, डॉ. पी. डी. पटाईत व अन्य शास्त्रज्ञ मंडळींनी सुचविलेल्या विविध चार टप्प्यांतील प्रतिबंधात्मक उपाययोजना तेवढ्याच महत्त्वाच्या ठरतात.

सततचे ढगाळ, दमट आणि पावसाळी वातावरण गोगलगायींच्या पैदाशीसाठी अनुकूल असल्याने त्यांची संख्या कित्येक पटींनी वाढते. गेल्या दोन-तीन वर्षांत पावसाळा लांबल्याने शंखी गोगलगायींची पुढची पिढीही सक्रिय झाली. डिसेंबर-जानेवारीच्या थंड वा उष्ण वातावरणात गोगलगायी सुप्तावस्थेत राहिल्या. २०२२ सालच्या खरीप हंगामात तुलनेने लवकर पाऊस सुरू झाला आणि शंखी गोगलगायींच्या सुप्तावस्थेतील दोन्ही पिढ्या सक्रिय झाल्या. हा कटू अनुभव विचारात घेता यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी हाती घ्यावयाच्या विविध चार टप्प्यांपैकी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या पहिल्या टप्प्यात पेरणीपूर्वी उन्हाळ्यात शेतात पलटी नांगराच्या साह्याने खोल नांगरट करून घेतली तर सुप्तावस्थेतील शंखी गोगलगायी वरच्या थरात येतात. साधारणपणे या सुप्तावस्थेतील गोगलगायी जमिनीत अर्ध्या फुटाच्या आत खोलात राहतात. त्यामुळे पलाटी नांगराने अर्ध्या फुटापेक्षा जास्त खोलवर चालविल्यास गोगलगायी जमिनीच्या वरच्या थरात येतात. दिवसा-दुपारच्या उन्हात पक्ष्यांच्या मदतीने नष्ट होतात.

हेही वाचा >>> आरोग्यदायी नाचणीची लागवड

दुसरी उपाययोजना सोयाबीनची लागवड केल्यानंतर लगेच करावयाची आहे. शेतात पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी सामूहिकपणे मोहीम राबवून शंखी गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात. गोगलगायींना शेतात शिरकाव करण्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण शेताच्या बांधाच्या आतील बाजूंनी किंवा बांधाजवळून दोन्ही बाजूंनी एक ते दोन फुटांचे चर पाडावेत. बांध स्वच्छ ठेवून त्यापासून आत तंबाखू भुकटी, कोरड्या राखेचा किंवा चुन्याचा १० सेंमी रुंदीचा पट्टा आखावा. हा पट्टा ओलांडताना गोगलगायी नष्ट होण्यास मदत होते. आणखी एक उपाय म्हणजे बाजारात उपलब्ध असलेल्या ‘स्नेल किल’ नावाच्या औषध गोळ्यांचा उपयोग परिणामकारक ठरतो. या मोठ्या आकाराच्या औषध गोळ्यांचे रूपांतर छोट्या आकाराच्या गोळ्यांमध्ये करावे आणि बांधाच्या आतील बाजूने, शेताच्या सभोवताली ५ ते ७ फूट अंतराने एक गोळी टाकावी. ही गोळी चाटल्यानंतर गोगलगायी चार ते पाच तासांत नष्ट होतात. निंबोणी पावडर, निंबोणी पैंड, ५ टक्के निंबोणी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर बांधावर करणे इष्ट ठरते.

आणखी एक उपाययोजना सुतळी गोणपाटाच्या माध्यमातून करावयाची आहे. सोयाबीनची उगवण झाल्यानंतर जर गोगलगायी शेतामध्ये किंवा बांधाच्या आतील बाजूंनी दिसत असतील तर रात्रीच्या वेळी शेतात ७ ते ८ मीटर अंतरावर वाळलेले गवत किंवा भाजीपाल्याच्या अवशेषाचे ढीग किंवा सुतळी गोणपाट गुळाच्या पाण्यात भिजवून करून ठेवल्यास तेथे गोगलगायी आकर्षित होतात. दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी, सूर्योदयाप्रसंगी या गोळा झालेल्या शंखी गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यामध्ये घालून नष्ट करता येतात. त्यासाठी हातात प्लास्टिक पिशवी किंवा कापडी हातमोजे आणि तोंडावर मुखपट्टी (मास्क) घालणे आवश्यक आहे. कारण काही गोगलगायींच्या प्रजाती विषारी असतात. गोळा केलेल्या गोगलगायी पाण्यामध्ये, ओढ्यामध्ये, पांदण किंवा शेतामध्ये तशाच टाकायच्या नाहीत. गोळा केलेल्या गोगलगायींवर ५ लिटर तंबाखूचे द्रावण (२५० ग्रॅम तंबाखू भुकटी ७.५ लिटर पाण्यात उकळून केलेले द्रावण) आणि कॉपर सल्फेट म्हणजेच ५ लिटर मोरचूद द्रावण (३०० ग्रॅम कॉपर सल्फेट ५ लिटर पाण्यात) असे एकूण १० लिटर द्रावण फवारावे. लहान आकाराच्या शंखी गोगलगायींच्या नायनाटासाठी १० टक्के मिठाची फवारणी (१०० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) करणे फायदेशीर ठरते. जास्त आर्द्रता असताना सोयाबीन शेतात एकरी २ किलो प्रमाणात पसरून ठेवावे. दाणेदार मेटाल्डिहाइडला पर्याय म्हणून आयर्न फॉस्फेटचा वापर करता येतो. आयर्न फॉस्फेटच्या संपर्कात गोगलगायी आल्यास त्या उपाशी राहून मरतात. मात्र त्याची परिणामकारकता दिसण्यासाठी प्रति २ किलो आयर्न फॉस्फेटमध्ये ४ मिलि स्पिनोसॅड वापरता येते.

शेतकऱ्यांच्या बांधावर जागृती

यंदाच्या खरीप हंगामात एकट्या सोलापूर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर आणि राज्यात सुमारे ५० लाख हेक्टर क्षेत्राच्या घरात सोयाबीनचा पेरा झाला असताना सुदैवाने अजून तरी शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव आढळून आला नाही. त्याबाबत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूरक जागृती केली जात आहे. त्यासाठी समाज माध्यमांचाही प्रभावीपणे वापर होत आहे.-आर. टी. मोरे, कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सोलापूर