00-navratri-logo-lpआपल्या संस्कृतीत शक्तीच्या उपासनेला महत्त्व आहे. ती करणारे शाक्त हे मुख्यत्वे दुर्गादेवीचे म्हणजेच कालीमातेचे उपासक असतात. स्त्रीतत्वास प्रधान मानून केलेली जगातील ही एकमेव उपासना पद्धती असावी.

शिव: शक्त्या युक्तो यदि भवति शक्त: प्रभवितुं।

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

न चेदेवं देवो न खलु कुशल: स्पन्दितुमपि।

अत्स्त्वामाराध्यां हरिहरविरिञ्च्यादिभिरपि।

प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्य: प्रभवति।

जगद्गुरूआद्यशंकराचार्यविरचित शिखरिणीवृत्तातील सौंदर्यलहरी या स्तोत्रात श्रीत्रिपुरसुंदरीच्या नखशिख सौंदर्याची स्तुती केली आहे. अद्वैतवेदान्तमतप्रवर्तक आचार्य म्हणतात, ‘‘श्रीशिव जर शक्तीयुक्त असेल तर तो प्रभाव दाखविण्यास समर्थ होतो आणि जर असे नसेल तर तो खरोखरच हालचाल करण्यासदेखील असमर्थ ठरतो. (म्हणून), हे शक्तिस्वरूपिणि देवी!, विष्णू, शंकर, ब्रह्मदेव इत्यादिकांकडून पूज्य असलेल्या तुज नमस्कार करण्यास अथवा तुझे स्तवन करण्यासाठी, ज्याचे पदरी पुण्य नाही असा मनुष्य कसा बरे समर्थ होईल?’’

जगाच्या उत्पत्तिस्थितिविनाशास कारणीभूत अशा ब्रह्मा, विष्णू व शंकरांना कोणी निर्माण केले हे येथे सांगितले नाही पण हे तीनही देव शिवशक्तीयुक्त अशा या भगवतीचेच आराधन करतात असे येथे विदित केले आहे.

शब्दकोशांतील शक्ती

शक् – शक्नोति, या पाच प. प. धातूला क्तिन् प्रत्यय लावल्यावर शक्ति: हा स्त्रीिलगी शब्द तयार होतो. शक्ती म्हणजे बल, योग्यता, धारिता, ऊर्जा, पराक्रम, सामथ्र्य या अर्थाने येते.

रघुवंशात ‘श्वाने मौनं क्षमा शक्तौ’ अशा अर्थाने शक्ती येते.

राज्यशक्ती ही प्रभावशक्ती (प्रभुशक्ती), मन्त्रशक्ती (सत्परामर्श करण्याची शक्ती) तसेच उत्साहशक्ती (प्रेरकशक्ती) या अर्थाने येते. कवीकडे रचनाशक्ती, प्रतिभाशक्ती असते. काव्यांतर्गत अभिधा, लक्षणा व व्यञ्जना या तीन शक्ती आहेत.

शिवाचे पूजक ते शैव, विष्णूचे उपासक ते वैष्णव तर शक्तीचे उपासक ते शाक्त होत.

शाक्त म्हटल्यावर सर्वप्रथम मनात येते की येथे तांत्रिक पूजाविधी किंवा कर्मकांडांचा काही संबंध आहे का?

तन्यते विस्तारयते श्वानम् अनेन इति तंत्रम्।

तंत्र हा शाक्त पूजा पद्धतीतील एक ग्रंथ आहे आणि म्हणून तंत्रशास्त्रातील पद्धती अनुसरणे म्हणजे तांत्रिक होय.

शाक्त हे मुख्यत्वे दुर्गादेवीचे म्हणजेच कालिमातेचे उपासक असतात. स्त्रीतत्त्वास प्रधान मानून केलेली जगातील ही एकमेव उपासनापद्धती असावी.

शक्ती ही एकमेव वैश्विक सत्ता मानली गेली आहे. शक्ती हीच ब्रह्मस्वरूपिणी असून शिवतत्त्व हे तिच्यात विलीन झाले आहे.

वेदोऽ खिलो धर्ममूलम्। असे धर्मसूत्र सांगते. धर्माची श्रौत व स्मार्त अशी दोन अंगे दिसून येतात. श्रुतिमूलकधर्म  व स्मृतिमूलकधर्म याशिवाय धर्माचा तिसरा प्रकार सांगितलेला आहे, ज्यात वर्णाश्रमधर्म, निमित्तधर्म, साधारणधर्म इत्यादींचा समावेश आहे. धर्माचे दोन प्रकार हे अभ्युदय व नि:श्रेयस या गोष्टींच्या प्राप्तीकरिता आहे. जीवात्म्याची ऐहिक व पारलौकिक उन्नती अभ्युदयात येते तर नि:श्रेयसाने श्वानप्राप्ती व त्यानंतर मोक्षप्राप्ती होय. वेदप्रणीत नित्य नमित्तिक कम्रे निष्काम बुद्धीने केल्यानंतर चितशुद्धी होते व मनुष्य उपासनेचा अधिकारी होऊ शकतो. उपासना ही सकाम किंवा निष्काम अशी दोन्ही प्रकारे असू शकते. उपासनेचे वेगवेगळे मार्ग आहेत. शाक्तमार्ग हा त्यापकी एक मार्ग आहे. देवी उपासनेची बीजे वेदांत व देवीउपनिषदात आढळतात. सरस्वती, उमा. अदिति, उषा या देवतांचे वर्णन, श्वेताश्वतरोपनिषदातील महेश्वराची विविधा शक्ती, मुण्डकोपनिषदातील पराविद्या ती हीच शक्ती होय.

सिंधुसंस्कृतीच्या उत्खननात छोटय़ा छोटय़ा शेकडो स्त्रीप्रतिमा सापडल्या. नग्न प्रतिमांच्या कमरेभोवती एक कमरपट्टा आहे. दागिन्यांनी सजलेल्या या मूर्ती प्रमुख उपास्य देवतेच्या असाव्यात असा तर्क आहे. एका शिक्क्यावर ओळीने सात स्त्रियांची चित्रे आहेत. प्रत्येकीच्या पाठीवर लांब वेणी रुळत असून डोक्यावर िपपळाची डहाळी खोवलेली आहे. या सप्तमातृका असाव्यात असे प्रा. गायधनी व प्रा. राहुरकरांच्या ‘प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास’ या पुस्तकात विवेचन आहे. म्हणजे मातृकापूजनाची प्रथा तत्कालीन संस्कृतीत होती.

11-devi-chart-lp

शाक्त संप्रदायातील ग्रंथ

१) देवीमाहात्म्य म्हणजेच दुर्गा सप्तशती किंवा चंडीपाठ या नावाने ओळखला जाणारा व सुमारे सोळाशे वष्रे अगोदर रचलेला ग्रंथ. २) शाक्त उपनिषद् ३) देवीपुराण, ४) ललिता सहस्रनाम (ब्रह्माण्डपुराण), ५) देवी-गीता – देवी भागवत पुराण. ६) सौंदर्यलहरी, ७) तंत्र

िहदूंमध्ये फार प्राचीन काळापासून श्रुती, स्मृती व पुराणांप्रमाणे तांत्रिक उपासना प्रसिद्ध होती. त्या उपासनेस खूप मान दिला गेला. इतका की तंत्रवाङ्मयाला ‘आगमग्रंथ’ म्हणून संबोधले जाऊ लागले. सर्व जाती- जमातींना उपलब्ध असलेली ही उपासना वैदिक उपासनेस समांतर होती. या उपासनेत उपास्यदेवतांना अनुसरून पाच प्रकार होते.

12-devi-chart-lp

या सर्वाचा आचारधर्म सारखा व सदाचरण, पावित्र्य यांवर भर होता. अध्यात्मज्ञान व ईश्वरप्राप्ती हेच सर्वाचे ध्येय होते. जैन व बौद्धांनी तांत्रिकसाधनेचा पाया इथूनच रचला असावा. बौद्धांच्या पारिभाषिक संज्ञेत प्रज्ञा (स्त्री) व उपाय (पुरुष) असे येऊन प्रज्ञोपाय साधना हे नाव आले. परंतु िहदूंच्या साधनेत कालांतराने कदाचित तिबेटी तांत्रिकांच्या संसर्गाने वामाचारी (डाव्या हाताने केली गेलेली पूजा) व दक्षिणाचारी (उजव्या हाताने केली गेलेली पूजा) असे दोन पंथ पडले.

वामा म्हणजे स्त्री व वाम म्हणजे डावा व दक्षिणाचारी म्हणजे उजवा किंवा उत्तम आचारांचा, पवित्र असे भाग होते. त्यातील वामाचारी हे अत्यंत अनाचारी व पाच मकारांचे सेवन करणारे (मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा व मथुन) असे होते. त्यामुळे वामाचार हा कोणत्याही वैदिकांस मान्य नसलेला पंथ होय.

साधना व साधक

ग्रंथ हे संस्कृतमध्येच असल्यामुळे उच्चवर्णीय ब्राह्मणांचाच भर असला तरीही शाक्त संप्रदायांमध्ये जातिभेद मानत नाहीत, शूद्र किंवा स्त्रीसुद्धा गुरू होऊ शकते. साधना, मंत्र, तंत्र, न्यास, मुद्रा व कुंडलिनी योगाभ्यास गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच करावा लागतो. वामा भूत्वा यजेत् परम् म्हणजे स्त्री होऊनच परमतत्त्वाची आराधना करावी या न्यायाने प्रत्येक पुरुष साधकास स्वत:तील स्त्रीतत्त्व जाणावे लागते आणि त्यानंतरच पुरुषसाधक देवीची पूजा करण्यास प्राप्त ठरतो.

प्रमुख देवता

शाक्त संप्रदायी स्वत:ची इष्टदेवता निवडतो. कुटुंबातील परंपरा, प्रांतागणिक देवता, गुरुपरंपरा हाही भाग येतो. प्रसिद्ध असलेल्या देवतांमध्ये खालील देवता येतात.

आदि पराशक्ती, दुर्गा, लक्ष्मी, पार्वती, सरस्वती, गायत्री, गंगा, सीता, राधा, सती. प्राधान्याने दुग्रेची पूजा केली जाते पण संकल्पाकरिता शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघण्टा, कुष्माण्डा, स्कन्दमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या नवदुर्गा असतात. या नवदुर्गा, अष्टलक्ष्मी, पंधरा नित्या अशा देवता शाक्त उपासक पूजतात. देवीच्या दहा महाविद्यांना तांत्रिक पूजेत स्थान आहे. देवीच्या त्या दशमहाविद्या म्हणजे-

१.     काली- दश महाविद्य्ोतील प्रथम रूप, समस्त कला व विज्ञान शाखांचे प्रारंभ स्थान, शुंभ-निशुंभाचा वध केला.

२.     तारा- मोक्षदायिनी, नील सरस्वती

३.     छिन्नमस्ता- जया व विजया या सख्यांची भूक भागविण्यासाठी स्वत:चा शिरच्छेद केला.

४.     षोडशीमहेश्वरी- ज्ञानप्राप्ती व भोग आणि मोक्षप्रदात्री

५.     भुवनेश्वरी- या देवीजवळ कालितत्त्व ते कमलातत्त्वापर्यंत दहा अवस्था असतात.

६.     त्रिपुर भरवी- नृसिंह भगवानांची अभिन्न शक्ती

७.     धूम्रावती- उग्रतारा बिकट समस्यांचे निवारण करणारी

८.     बगलामुखी- ऐहिक, पारलौकिक, सामाजिक पीडा दूर करते.

९.     मातंगी- मानवाचे गृहस्थ जीवन सुखी करते.

१०.    कमलालया- समृद्धीचे प्रतीक, सार्वभौमत्व व पुरुषोत्तमत्वप्रदात्री, पद्मावती.

अशा प्रकारे वरील सर्व रूपे, सप्तमातृका व चौसष्ट योगिनी यांची उपासना केली जाते.

शाक्तांचे उत्सव :

’      शारदीय नवरात्रोत्सव- शरदऋतूत ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये येणारा उत्सव. असुषु रमन्ते इति असुर:। जो प्राणातच रममाण होतो,

भोगांतच आनंद मिळवितो त्या रेडय़ासारख्या महिषासुराचे मर्दन जिने केले त्या दुग्रेचा उत्सव.

२. चत्र नवरात्री / वसंत नवरात्री – चत्रात मार्च – एप्रिलमध्ये येणारा उत्सव. श्रीकुल परंपरेत ललिता देवीचे माहात्म्य

३. आषाढ नवरात्री – आषाढात जून-जुलमध्ये सप्तमातृकांतील वराही देवीचे माहात्म्य असलेला उत्सव.

४. गुप्त नवरात्री- माघात जानेवारीत – फेब्रुवारीत येणारी. त्यातील पंचमीचे महत्त्व शाक्तौपासकांसाठी महत्त्वाचे आहे.

५. दीपावलीतील लक्ष्मीपूजन- शाक्त व शाक्त नसलेल्या साधकांसाठी हे महत्त्वाचे आहे.

गुप्त नवरात्रीत दहा महाविद्या व भगवती दुग्रेचे विशेष पूजन व दुर्गा सप्तशतीचे पारायण केले जाते.

प्रथम चरित्र महाकालीचे, मध्यम चरित्र महालक्ष्मीचे व उत्तम चरित्र महासरस्वतीचे अशा प्रकारे विभाजित केले आहे. प्रत्येक चरित्रांत सात सात देवींचे चरित्र वर्णून एकवीस देवतांचे वर्णन आहे. नंदा, शाकम्भरी व भीमा या तिघी जणी सप्तशती पाठाच्या महाशक्त्या व दुर्गा, रक्तदन्तिका व भ्रामरी यांना बीज म्हटले आहे. सातशे श्लोक व तेरा अध्यायांमध्ये सप्तशती पाठ आहे.

अशा प्रकारे गुप्त नवरात्री तसेच अन्य उत्सवांमध्ये दुर्गा-सप्तशती पारायणाचे महत्त्व आहे.

शक्तिपीठे :

वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांत तसेच देवीच्या ग्रंथात देवीची शक्तिपीठे चारपासून ते एक्कावनपर्यंत सांगितली आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मीदेवी, माहुरगडाची श्रीरेणुकादेवी, तुळजापूरची श्रीतुळजाभवानीदेवी व अध्रे शक्तिपीठ असलेली वणीची श्रीसप्तशृंगीदेवी ही पीठे प्रसिद्ध आहेत. पशूंचा बळी देणे ही या संप्रदायातील परंपरा आहे.

अर्धनारी-नटेश्वररूपात शिव व शक्तीचा अभेद वर्णिला आहे. प्रकृति व पुरुष या सांख्यांच्या तत्त्वज्ञानात प्रकृती व पुरुष हे भिन्न आहेत पण पुरुष प्रकृतीविना कोणतेही काम करण्यास हतबल आहे हे सांगितले आहे.

अद्वैत इतके आहे की शिवशक्तीसमन्वयरूप अनेक वचने आढळतात.

सो कामयत। -इच्छाशक्ती

बहु स्यां प्रजायेयेति- ज्ञानशक्ती

इदं सर्वमसृजत् – क्रियाशक्ती

म्हणजेच जीवरूपाने ते निर्गुण निराकार तत्त्व सगुण साकार बनून म्हणजेच शिवशक्ती स्वरूपात या जगात प्रवेश करते झाले.

अशा प्रकारे

न शिवेन विना शक्तिर्न शक्तिरहित: शिव:।

उमाशंकरयोरैक्यं य: पश्यति स: पश्यति।

शक्तीची उपासना करणे हे आपल्या वेदोपासनेतही महत्त्वाचे मानलेले आहे. महाभारताच्या प्रत्येक पानापानावर बलोपासनेचे महत्त्व सांगितलेले आहे. आपल्या धर्म, राष्ट्र, संस्कृती यांचे महत्त्व टिकवून ठेवायचे असेल तर प्रत्येकास शाक्त होणे महत्त्वाचे आहे.
डॉ. सुनीता पाटील – response.lokprabha@expressindia.com