News Flash

धुळवडीचा रंग पांढरा

या गणितांमुळेच धुळवडीसारख्या कलरफुल सणामध्ये पांढऱ्या रंगाचं महत्त्व टिकू न आहे.

तेजश्री गायकवाड 

धूलिवंदनाचा सण म्हटलं की लगेच समोर येते ती रंगांची उधळण. रंगीबेरंगी रंगात न्हाऊन निघायचा एकमेव हक्काचा दिवस म्हणजे धूलिवंदनाचा दिवस. एवढय़ा सुंदर सुंदर रंगांमधूनही या धुळवडीच्या सणादिवशी पांढऱ्या रंगाचं महत्त्व काही औरच असतं. पांढऱ्या रंगावर होणारी रंगीबेरंगी पखरण हीच या दिवसाची खरी रंगत ठरते..

धुळवड म्हणजे रंगांचा उत्सव. नावातच रंगपंचमी आहे आणि तरीही या दिवशी रंग खेळायला जाताना अनेक जण पांढऱ्या रंगाच्या कपडय़ांची निवड करतात. पांढऱ्या रंगाचे कपडे घालून हा रंगारंग सण साजरा करण्याची मजाच काही और आहे. पांढऱ्या रंगाला असलेले महत्त्व, त्याचं वैशिष्टय़ इथपासून ते फिल्मी होळ्यांचा आपल्यावर असलेला प्रभाव या सगळ्या कारणांमुळे या सणाचं पांढऱ्या रंगाचं माहात्म्य आजही टिकू न आहे. मात्र पूर्वापार चालत आलेला धुळवडीचा सण आणि पांढऱ्या रंगाचा ट्रेण्ड यामागे असलेल्या गणितांचा आपण फारसा विचार करत नाही. या गणितांमुळेच धुळवडीसारख्या कलरफुल सणामध्ये पांढऱ्या रंगाचं महत्त्व टिकू न आहे.

शांतीचं प्रतीक आणि बंधुता

शांतीचं प्रतीक म्हणून पांढरा रंग ओळखला जातो. सणाच्या दिवशी कोणताही वाईट प्रसंग न ओढवता शांततेत, आनंदात योग्य रीतीने सण साजरा व्हावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. या सणाच्या दिवशी शास्त्रानुसार वाईटावर चांगल्याचा विजय होतो म्हणूनच आदल्या दिवशी होळीला होलिकादहन केले जाते. आधीच्या सगळ्या वाईट गोष्टी विसरून बंधुतेने आणि शांततेने सण साजरा व्हावा म्हणूनही पांढरा रंग परिधान केला जातो.

रंगांची उधळण

मनसोक्त केलेली रंगांची उधळण पांढऱ्या रंगावर सहज दिसून येते. हेही एक कारण आहे ज्यामुळे पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याकडे अनेकांचा कल असतो. बाकीच्या रंगावरती सहसा गुलाल किंवा अन्य रंग उठून दिसत नाहीत. परंतु पांढरा रंग एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हासप्रमाणे असतो आणि म्हणूनच लोक धूलिवंदनाच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या कपडय़ांना पसंती देतात.

बॉलीवूडचा पगडा

आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते अगदी राहायचं कसं? काय परिधान करायचं? इथपर्यंत आपल्या अनेक गोष्टींवर मनोरंजनसृष्टीचा प्रभाव जाणवतो. इंटरनेटमुळे जवळ आलेलं जग त्यात अजूनच भर घालताना दिसतं आहे. अशा वेळी या प्रभावातून आपले सणवार तरी कसे सुटतील? कोणत्याही भारतीय भाषांमधील चित्रपट असो वा एखादी मालिका, त्यात होळीचा सण साजरा होत असताना हमखास पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेले कलाकार आपल्याला बघायला मिळतात. जुन्या काळातील अमिताभ यांचे गाजलेले रंग बरसे असो.. वा आताच्या काळातील गो पागल.. अशा हिट गाण्यांवर थिरकणारे कलाकारही पांढऱ्या रंगाचे आऊटफिट घातलेले आपल्याला दिसून येतात. याशिवाय वर्षांनुर्वष बॉलीवूड कलाकार आणि अन्य सेलिब्रिटींकडून आयोजित के ल्या जाणाऱ्या पाटर्य़ानाही उपस्थित राहणारे सगळे कलाकार खासकरून पांढऱ्या रंगाच्या कपडय़ांचीच स्टायलिंग करताना दिसतात.

टू लुक कुल : होळी, धूलिवंदन हे सण उन्हाळ्यात येतात. गरमीच्या दिवसात तर पांढरा रंग सगळ्यात जास्त आवडीचा रंग असतो. उन्हाळ्यात पांढरा रंग हा नवीन काळा रंग झालेला असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण बाकीच्या सीझनमध्ये तरुणाईचा ऑल टाइम फेवरेट रंग प्रामुख्याने काळाच असतो. पांढरा रंग हा नेहमीच कुल दिसतो. आणि सोबतच कोणीही हा रंग सहज कॅरी करू शकतो. धूलिवंदनाच्या दिवशी तुम्ही मस्त पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटवर छानशी सिल्वर ज्वेलरी घाला, बंडाना बांधा आणि कडकडत्या उन्हापासून वाचण्यासाठी सनग्लासेससह लुक पूर्ण करा.

उत्तम फोटोसाठी

या सोशल मीडियाच्या जमान्यात आजची काय तर सगळ्याच वयोगटातील पिढी प्रत्येक छोटय़ा छोटय़ा गोष्टींचे फोटो काढून सोशल मीडियावर आवर्जून टाकत असते. मग यामध्ये धूलिवंदनासारखा सण तरी कसा मागे राहील. या दिवशी मनसोक्त रंग खेळून झाल्यावर तुम्ही फोटो काढताना तुम्हाला खऱ्या अर्थाने पांढऱ्या रंगाचं महत्त्व समजेल. पांढऱ्या रंगावर पडलेले विविध रंग छान उठून दिसतात आणि त्यामुळे साहजिकच फोटोही उठून दिसतो. आपला पूर्ण ग्रुपचा विविध रंगात रंगलेल्या पांढऱ्या  आऊटफिटमधला फोटो किती सुंदर दिसेल याची कल्पना करा आणि आवर्जून पांढऱ्या रंगाचे कपडे घाला. पांढऱ्या रंगाचा आऊटफिट आणि त्यावर रंगाची पखरण यासोबत तुम्ही छान फोटोशूटही करू शकता.

काय मग, तुम्हीही पांढऱ्या रंगाबरोबर त्यावर चढणाऱ्या रंगांना ‘कुछ दाग अच्छे होते है’ म्हणत धूलिवंदन साजरा करायला विसरू नका..

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 1:39 am

Web Title: article about holi festival celebration zws 70
Next Stories
1 वस्त्रान्वेषी : पगडबंद आठवणी
2 संशोधनाची वाढती मात्रा
3 पॅड ‘केअर’ लॅब
Just Now!
X