त्वचेची नियमित काळजी घेणे, त्वचेची आद्र्रता राखून ठेवणे महत्त्वाचे आहे, हे माहीत असूनही भारतीय महिला त्याकडे दुर्लक्ष करतात, असे एका सर्वेक्षणात नुकतेच उघड झाले. तज्ज्ञांशी बोलून जमा केलेल्या त्वचेच्या या बेसिक आरोग्यासाठीच्या या काही टिप्स
सध्या दिवस बदलाचे आहेत. वातावरणासाठी, हवामानासाठीही हे लागू आहे. खरंतर एव्हाना गुलाबी थंडीची चाहूल लागायला हवी होती. पण अद्याप आपण कडक उन्हात होरपळतो आहोत. रात्री उशिरा आणि पहाटे थोडा गारवा जाणवतो. पण या बदलांचा सगळ्यात वाईट परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर. या बदलाच्या काळात आणि येणाऱ्या नव्या सीझनसाठी त्वचेला सगळ्यात जास्त आवश्यकता असेल ती ओलाव्याची. या काळात त्वचा कोरडी पडते, रुक्ष होते. म्हणूनच त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. त्वचेला मॉइश्चराइझ करणं आवश्यक असतं. त्यासाठी बाजारात मिळणारी वेगवेगळी प्रॉडक्ट्स असतात. शिवाय आजीच्या बटव्याचे घरगुती उपायही असतातच.
‘प्रीटी वुमन’ असं स्वत:च्या रूपाबद्दल कोणत्या स्त्रीला ऐकायला आवडणार नाही! रोजच सुंदर दिसावं असं प्रत्येक स्त्रीला वाटतं, पण त्यासाठी आपल्या त्वचा आतून निरोगी राहण्यासाठी किती जणी काळजी घेतात? जगप्रसिद्ध ब्रॅण्ड नेम असणाऱ्या एका बडय़ा कंपनीनं नुकताच भारतात या संदर्भात एक सव्‍‌र्हे केला. भारतातील किती महिला स्वत:च्या त्वचेत आद्र्रता राखण्यासाठी उपाय करतात यासाठी हे सर्वेक्षण होतं. या सर्वेक्षणानुसार भारतातील स्त्रियांना त्वचेला नियमित मॉइश्चराइझ केल्यानं त्वचेचं नुकसान होण्यापासून आणि  अकाली प्रौढत्त्व यासारख्या समस्यांपासून संरक्षण होऊ शकतं, हे माहीत असूनही कुठल्याही प्रकारे काळजी घेत नाहीत ही बाब समोर आली. या सर्वेक्षणानुसार ३१ टक्के भारतीय आपली त्वचा अजिबात मॉइश्चराइझ करत नाहीत. ७५ टक्के भारतीयांना रुक्ष त्वचेवर मॉइश्चराइझ करणं हा उपाय आहे, हे माहीत आहे. तरीही ते त्वचेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्वचेची काळजी न घेतल्यामुळे अकाली प्रौढत्व आल्यासारखं दिसू लागतं. ही बाबदेखील त्यांना माहीत आहे.
या संदर्भात हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ‘स्किन एक्स्पर्ट’ डॉक्टर अपर्णा संथानम म्हणाल्या, ‘ड्राय स्किन असणं ही भारतीय महिलांची सामान्य समस्या आहे. त्यामुळेच त्वचेच्या वरच्या भागावर अपुऱ्या हायड्रेशनमुळे मॉइश्चरचा थर निर्माण होतो. त्यामुळेच त्वचा कोरडी होऊन ‘डल’ होते. शिवाय रफ पॅचेसही उठतात. हिवाळा आला की किंवा त्वचा जरा कोरडी दिसायला लागल्यावरच केवळ त्वचा मॉइश्चराइझ करावी, असं बऱ्याच जणांना वाटतं. पण हे साफ चुकीचं आहे. त्वचा सतत मॉइश्चराइझ करणं ही त्वचेची देखभाल करण्याची रुटीन प्रक्रिया आहे. त्वचा सतत हायड्रेटेड ठेवल्यामुळे त्वचेचा ग्लो कायम राखण्यास व त्वचा आरोग्यदायी ठेवण्यास मदत होते’.
त्वचेची काळजी कशी घ्यायची, कोणतं मॉइश्चरायझर वापरायचं, किती लावायचं हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या काही टिप्स..
तज्ज्ञांचा सल्ला
आपल्या रुक्ष त्वचेवर इलाज म्हणून आपण स्थानिक मेडिकल स्टोअरमध्ये चौकशी केली तर तिथून एखादं प्रॉडक्ट मिळेलही. पण निरोगी आणि सुंदर त्वचेचा सल्ला मिळण्याची ती जागा नाही. कारण तिथे मिळालेलं मॉइश्चरायझर आपल्या त्वचेला सूट होणारं आहे का, वगैरे प्रश्न बाजूलाच राहतील. नुसतं कोल्ड क्रीम द्या, असं म्हणून भागणार नाही. कुठलं, त्यामध्ये काय असायला हवं याबाबत त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं चांगलं. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य ते निदान करून आपल्याला उत्तम सल्ला मिळू शकतो.
कोणतं मॉइश्चराझर वापरावं?
एकच मॉइश्चरायझर वर्षभर वापरायचं असं काहींचं म्हणणं असतं. पण ते पूर्णत: चुकीचं आहे. ज्याप्रमाणे ऋतू बदलतो त्याप्रमाणेच आपल्या त्वचेच्या काळजी घेण्याच्या पद्धतीमध्येही बदल करावे लागतात. त्यासाठीच हिवाळ्यात ऑइंटमेंट बेस्ड मॉइश्चराइजर वापरणं हा उत्तम पर्याय असतो. यात तेलाचा समावेश असल्यामुळे त्वचेत अधिकाधिक आद्र्रता टिकून राहते. त्वचेला पोषण मिळतं आणि त्यामुळे त्वचा बाहेरून तजेलदार दिसते. शिवाय त्वचेवर एक सुरक्षात्मक स्तरही तयार होतो. चेहऱ्याला लावायचे मॉइश्चराइझर वेगळे असतात आणि अंगाला, हाता-पायांना लावण्यासाठी वेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायझर निवडावं लागतं. आपापल्या त्वचेच्या गरजेप्रमाणे आणि कंडिशनप्रमाणे यात बदल करणं आवश्यक असतं.
केसांची काळजी
हिवाळ्यातील कोरडय़ा हवेमुळे आपले केस कोरडे होतात. त्यामुळे ‘स्प्लिट इंड्स’ होण्याचाही धोका असू शकतो. हिवाळ्यात वारंवार केस धुतल्याने ते अधिक कोरडे होऊ  शकतात. खूपच कमी वेळा केस धुतले तर कोंडाही होऊ  शकतो. त्यासाठीच केस धुतल्यानंतर कंडिशनरचा वापर करावा. हे केल्यानंतरही जर केस कोरडे राहिले तर सिरमचाही वापर करू शकतो.
आहार
हिवाळ्यात जीवनसत्त्वे अ, इ१, इ२ असलेल्या भाज्यांचा आणि फळांचा समावेश आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. डेअरी उत्पादनं, धान्य उत्पादनं, अंडी, मांस आणि हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश असला पाहिजे. त्वचेच्या आरोग्यासाठी ही जीवनसत्त्वे महत्त्वाची असतात. शिवाय आहारात भरपूर द्रवपदार्थही घ्यावेत. त्यातून आपोआपच नैसर्गिक पद्धतीने आपल्या त्वचेला तेल पुरवून तिचं संरक्षण करू शकतो.
हिवाळ्यातील मेक-अप
सुंदर दिसण्यासाठी मेक-अपचं योगदानही मोठय़ा प्रमाणात असतं. हिवाळ्यात मात्र मेक-अप करण्यापूर्वी प्रथम त्वचा योग्य प्रकारे मॉइश्चराइझ करून घ्यावी. त्यानंतर तुम्ही क्रीम बेस मेक-अप करू शकता. शिवाय दुपारच्या उन्हातील हानिकारक अल्ट्रा व्हायोलेट किरण टाळण्यासाठी सनस्क्रीनचाही वापर करणे गरजेचे आहे.
साबणाचा वापर
आंघोळ करताना ग्लिसरीन सोप किंवा मॉइश्चरायझिंग बॉडीवॉशचा वापर करावा. शक्यतो साबणाचा वापर टाळावा. कारण त्यामुळे त्वचा कोरडी पडते.
लोशन्स आणि क्रीम
लोशन्सच्या स्वरूपातली मॉइश्चरायझर्स अतिशय हलकी असतात. तर क्रीम स्वरूपातली मॉइश्चरायझर जास्त घट्ट असतात, स्ट्राँग असतात. त्यामुळे अधिक कोरडय़ा त्वचेसाठी लोशनपेक्षा क्रीमचा पर्याय चांगला आहे.
पाणी
हिवाळ्याच्या दिवसात तहान लागत नाही. तसंच दिवसभर एसीमध्ये बसल्यानंही तहान कमी लागते. कमी पाणी पिण्याकडे कल असतो. पण त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यासाठी आवश्यक असणारा पाणी हा घटक कमी पडतो. त्वचेचा तजेला राखण्यास पाणी मदत करते. त्यामुळेच अधिकाधिक पाणी प्यावं. शिवाय हर्बल चहा घेणं हादेखील आपली त्वचा मॉइश्चराइझकरण्याचा उत्तम पर्याय आहे.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो