01 October 2020

News Flash

मिकीज् फिटनेस फंडा : स्त्रीच्या आरोग्याला बळकटी देणारे अन्नघटक

योग्य आहार घेतल्याने आपलं शरीर, मन आणि आत्मा बळकट बनतो आणि त्याचं शुद्धीकरणही होतं. मानवी शरीरात ज्या अन्नघटकांचं पचन सहजगत्या होतं, ते घटक आपल्याला भरपूर

| June 28, 2013 01:49 am

योग्य आहार घेतल्याने आपलं शरीर, मन आणि आत्मा बळकट बनतो आणि त्याचं शुद्धीकरणही होतं. मानवी शरीरात ज्या अन्नघटकांचं पचन सहजगत्या होतं, ते घटक आपल्याला भरपूर ऊर्जा आणि पोषण पुरवतात तर अयोग्य आणि अतिरेकी खाण्यामुळे आजारांना आमंत्रण मिळतं. आपल्या मेंदूची वर्तवणूक, आपले मूड्स, विचारप्रक्रिया आणि ताणाचं व्यवस्थापन यामध्ये आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. नेहमीच ताजं, नैसर्गिक आणि हितावह अन्न खाल्लं पाहिजे. कारण या अन्नामध्ये औषधी, रोगनिवारक आणि पुनर्योजी गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या दररोजच्या आहारात फळं, भाज्या, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली धान्यं, चवळी वर्गातली धान्यं, अख्खी धान्यं, सुकामेवा आदींचा समावेश आवर्जून केलेला असावा. मानवी शरीराला आवश्यक असणाऱ्या-पोषक घटक, बुद्धी, वाढ आणि सर्जनशीलता या गोष्टी याच अन्नघटकांकडून मिळतात.
अन्न पोषण करणारं, शरीरातले अनावश्यक घटक काढून टाकणारं, शरीराचं शुद्धीकरण करणारं असावं. त्यामुळे शरीर सातत्याने स्वत:चं पुनर्योजन करू शकेल आणि त्याची योग्य वाढही होईल. या प्रक्रियांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती अबाधित राहील आणि शरीर तसंच मनाची दुरुस्ती, पुनरुज्जीवन, रोगनिवारण होऊन त्यांना नवसंजीवनी मिळेल.

मी पुढील ९ सुपर हिलिंग अन्नपदार्थाची शिफारस करेन..  
अख्खी धान्यं : मदा आणि इतर सर्व रिफाइण्ड पिठांऐवजी अख्खी धान्यं वापरण्यास सुरुवात करा. आतडय़ांचा कॅन्सर, बद्धकोष्ठता, पचनाचे आजार, हृदविकार आदी विकारांशी लढण्यास मदत करतात. उदाहरणार्थ गहू, ओट्स, बार्ली आदी.

भरड धान्यं : यामध्ये मुबलक प्रमाणात ‘बी’ जीवनसत्त्व जसं बी ६, फॉलिक अ‍ॅसिड, नियासिन, खनिजं जसं कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, झिंक, मायक्रो न्यूट्रिएण्टस जसं प्रथिनं, कॉम्प्लेक्स काबरेहायड्रेट्स आणि फायबर असतं. त्यांच्यापासून भाकरी, चिल्ला, पॉरिज हे पदार्थ बनवता येतात. तसंच सूपला घट्टपणा येण्यासाठीही त्यात भरड धान्यं घालता येते. उदा.- ज्वारी, बाजरी, नाचणी

भाज्या : या हृदयाला बळकट बनवणाऱ्या आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या असतात. भाज्या अल्कधर्मी असतात आणि त्यामध्ये मुबलक जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. यामध्ये लाल, नािरगी, पिवळ्या रंगांच्या भाज्यांचा आहारात समावेश करावा कारण त्यांच्यात मुबलक बिटा कॅरोटिन आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात.

हिरव्या पालेभाज्या : या भाज्यांमध्ये खूप कमी कॅलरीज आणि कोलेस्टेरॉल तसंच कॅन्सरशी दोन हात करणारे घटक असतात. या भाज्या हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगल्या असतात. पालक, लेटय़ुस, मेथी, मुळ्याचा पाला, अमरंथ, कोबी अशा पालेभाज्या सूप, सॅलडसाठी योग्य आहेत. तसंच त्यांचं पुरण बनवून ते पराठय़ामध्ये स्टफही करता येतं.

फळं : फळांमध्ये कोणतेही कृत्रिम रंग, प्रिझव्‍‌र्हेटिव्हज नसतात. फळं नसíगकरीत्या रक्त शुद्ध करतात, ऊर्जा वाढवतात, त्यांच्यात अल्कली प्रभाव असतो आणि मुबलक अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट असतात. दररोज तीन ते चार वेळा फळं खाल्ली पाहिजेत.

चवळी वर्गातली धान्यं : कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी या धान्यांची शिफारस केली जाते. शिवाय त्यांच्यात मुबलक फायबर आणि पोषक घटकही असतात. ही धान्यं सॅलड, सूप, आमटी, डिप्स आणि प्युरीजच्या माध्यमातून वापरता येतात. या धान्यांना मोड आणल्यास त्यातले पोषक घटक दुपटीने वाढतात आणि ती मुक्त हस्ते सॅलड्समध्ये वापरता येतात.

सुकामेवा आणि बिया : रक्तदाब, कोलेस्टेरॉल सुरळीत करण्यासाठी यांचा मोठा फायदा होतो. त्याचबरोबर ऑस्टिओपोरॉसिस टाळण्यासाठीही सुकामेवा आणि बिया खाव्यात. त्यांच्यात भरपूर इसेन्शिअल फॅट्स, अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस, ‘ई’ आणि ‘ब’ जीवनसत्त्व तसंच कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वं असतात. त्वचा आणि केसांसाठी ते चांगले असतात.

भाज्यांचे रस : यकृत आणि रक्तशुद्धीकरण करणारा नसíगक पदार्थ म्हणून भाज्यांच्या रसांकडे पाहता येईल. भाज्यांचे रस ताजे बनवून प्यावेत. तसंच ते गाळू नयेत. त्यांच्यात िलबाचा रस, आलं, मिरी आणि संधव घालून चव वाढवता येईल. दुधी, टोमॅटो, गाजर, बीट, कोबी, पुदिना, कोिथबीर, सेलसी, तुळस आदींचे रस प्यावेत.

हर्बल आणि ग्रीन टी : ग्रीन आणि हर्बल टीचे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले फायदे असतात. त्यांच्यात मुबलक अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस असतात. शिवाय ते मधुमेहाला अवरोध करतात. या चहांमुळे दात खराब होणं, उच्च रक्तदाब, हृदरोग आणि काही प्रकारच्या कॅन्सरना अवरोध करता येतो. हे चहा शुद्धीकरणाचंही काम करतात. दररोज तीन ते चार कप ग्रीन टी घ्यावा.

सर्व वयोगटातल्या महिलांना आपल्या आहारामध्ये वर उल्लेख केलेले घटक विशेषत: फळं, स्प्राऊट्स, सॅलड, सुकामेवा आणि पाणी समाविष्ट करावेत. त्यामुळे मुरुमं, तेलकट त्वचा, कोंडा तसंच केस गळण्यासारखे त्वचेचे आजार उद्भवत नाहीत.
४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या स्त्रिया ज्यांची रजोनिवृत्ती जवळ आलेली असते, त्यांनी आपल्या आहारात अळशीच्या बिया, प्राइमरोझ ऑइल्स, तीळ, सुकामेवा यांचा आवर्जून समावेश करावा. हे घटक गर्भाशय आणि स्तनांचा कॅन्सर, ऑस्टिओपोरॉसिस आणि हृदविकारांपासून संरक्षण देतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2013 1:49 am

Web Title: mickys fitness funda food component to support women health
टॅग Diet,Fitness,Ladies
Next Stories
1 ओन्ली स्टार्टर्स
2 क्लिक
3 व्हिवा दिवा
Just Now!
X