News Flash

मॉन्सून आणि हेअर केअर

आपला केशसंभार सुंदर आणि आकर्षक राहावा यासाठी तुम्ही नेहमीच प्रयत्न करत असाल, पण एरव्ही शहाण्यासारखे वागणारे केस आद्र्रता आणि पावसामुळे कधीकधी एकदम बेताल बनतात. पावसामुळे

मॉन्सून आणि हेअर केअर

आपला केशसंभार सुंदर आणि आकर्षक राहावा यासाठी तुम्ही नेहमीच प्रयत्न करत असाल, पण एरव्ही शहाण्यासारखे वागणारे केस आद्र्रता आणि पावसामुळे कधीकधी एकदम बेताल बनतात. पावसामुळे केस आणि त्वचेच्या असंख्य समस्या उभ्या राहतात. कपडय़ांमुळेही या मनस्तापात भर पडू शकते. दीपिका पदुकोनने सांगितलेल्या या सोप्या गोष्टी पाळा आणि सतत गॉर्जअिस राहा.
केसांची काळजी- पावसाळ्यात केस नेटके आणि सुरक्षित राहावेत यासाठी आधीपासूनच काळजी घ्या. केसांची योग्य काळजी घेतल्यास ते पावसाळ्यातही चमकदार आणि स्टायलिश राहतात. कामानिमित्त मला बराच आणि सातत्याने प्रवास करावा लागतो. त्यामुळे टोकाच्या वातावरणामध्ये काम करावं लागतं, ज्याचा परिणाम अंतिमत: केसांवर झाल्याशिवाय राहत नाही. मी माझ्या केसांना नेहमीच ताज्या नारळाच्या तेलाने मसाज करते. त्यामुळे केस दुभंगणं, शुष्क होणं किंवा अनियंत्रित बनणं अशा समस्या उद्भवत नाहीत.
सुंदर केशरचना-
पावसाळ्यातला माझा सर्वोत्तम लूक म्हणजे केसांचा थोडा विस्कळीत, पण छान दिसणारा पोनीटेल. तो सोपा आहे, प्रॅक्टिकल आहे आणि स्टायलिशही!
कपडय़ांची निवड-
पावसाळ्यात मी कॉटन आणि लिननच्या कपडय़ांना सर्वाधिक पसंती देते. फ्लोरल िपट्र आणि पेस्टल शेड्समध्ये प्रयोग करायला मला खूप आवडतं.
मी अ‍ॅक्सेसरीज साध्या ठेवते आणि त्यांना चष्म्यांच्या मजेशीर फ्रेम्स आणि घडय़ाळांची जोड देते.
आहार-
भरपूर प्रवास करत असल्याने मी जेव्हा कधी मुंबईत असते तेव्हा घरच्या अन्नालाच पसंती देते. माझा आहार संतुलित असतो. मी नेहमीच गोड पदार्थ खात असते. स्वत:ला हायड्रेटेड ठेवणंही महत्त्वाचं असतं.
ऊ आधुनिक काळातल्या केसांची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमधलं अभिनव आणि प्रभावी उत्पादन म्हणजे ताज्या नारळापासून बनवलेलं हेअर ऑइल. हे तेल हलकं असतं आणि त्याची गुणवैशिष्टय़े आधुनिक जगातल्या केसांच्या सर्व गरजांची पूर्तता करतात. हे तेल तुमच्या केसांची हळुवारपणे काळजी घेतं आणि त्यावर प्रेमही करतं.
ऊ पावसामध्ये केस ओले होऊ देऊ नका. अशाने केसांमधले हायड्रोजन बंध तुटून केस कमकुवत बनतात. पावसाच्या पाण्यातले प्रदूषक घटक केसांना निष्प्राण आणि चिकट बनवतात. पावसाळ्यात केसांसाठी सौंदर्योपचार करणं गरजेचं आहे. ताज्या नारळापासून बनवलेल्या हेअर ऑइलचा याकामी उपयोग करता येईल. या तेलाने केसांना आठवडय़ातून दोन मसाज केल्यास आद्र्रतेमुळे ते शुष्क, अनियंत्रित आणि चिकट बनत नाहीत.
ऊ प्रत्येकाने आपल्या आहारात ताजी फळं, ओट्स आणि मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करावा. त्याचबरोबर केसांच्या वाढीला चालना मिळण्यासाठी चीज स्लाइस, सुकामेवा, रताळं, कॉडलिव्हर ऑइलचं सेवन करावं.
ऊ पावसाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी घरगुती उपायही योजावेत. एक कप कोमट पाण्यात दोन टेबलस्पून व्हिनेगर घालून त्याने केस धुतल्यास त्यांना छान चमक आणि दाटपणा प्राप्त होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2013 12:07 pm

Web Title: monsoon and hair care
टॅग : Ladies,Lady,Monsoon,Woman
Next Stories
1 ट्रेकर्सÊ आणि सह्य़ाद्रीचा पाऊस!
2 व्हिवा रिपोर्टिग टीम
3 चकवा
Just Now!
X