21 February 2020

News Flash

व्हिवा लाउंजमध्ये मुक्ता बर्वे

‘जोगवा’, ‘मुंबई- पुणे- मुंबई’ असे वैविध्यपूर्ण चित्रपट, ‘देहभान’, ‘हम तो तेरे आशिक है’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘फायनल ड्राफ्ट’ सारखी वेगळी नाटकं आणि ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी

| February 28, 2014 01:13 am

‘जोगवा’, ‘मुंबई- पुणे- मुंबई’ असे वैविध्यपूर्ण चित्रपट, ‘देहभान’, ‘हम तो तेरे आशिक है’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘फायनल ड्राफ्ट’ सारखी वेगळी नाटकं आणि ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ सारख्या लोकप्रिय मालिकांमधून आपल्या चतुरस्र अभिनयाचे दर्शन घडवणारी प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. मुक्ता ‘छापाकाटा’द्वारे नाटय़निर्मातीही बनली आहे. या नव्या भूमिकेविषयी तसंच नाटय़शास्त्राची बुद्धिमान विद्यार्थिनी ते एक प्रगल्भ अभिनेत्री या प्रवासाविषयी व्हिवा लाउंजच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. या निमित्ताने व्हिवा लाउंजची मैफल प्रथमच ठाण्यात रंगणार आहे. टिपटॉप प्लाझा या कार्यक्रमाचा व्हेन्यू पार्टनर आहे.
कधी : शुक्रवार, ७ मार्च २०१४ / कुठे : टिप-टॉप प्लाझा, एल.बी. एस. मार्ग, ठाणे (प) / वेळ : दुपारी ३.४५ वा.

First Published on February 28, 2014 1:13 am

Web Title: mukta barve in viva lounge
Next Stories
1 मराठीची बोलू कौतुके
2 वेगळ्या ग्रहावरची माणसं
3 व्हिवा वॉल : मराठी दिन
X