मॉडेलिंगसारख्या फारशा परिचित नसलेल्या क्षेत्रातल्या सगळ्या शंका-कुशंकांना मनमोकळी उत्तरं देत ब्युटी क्वीन अमृता पत्कीनं उपस्थितांची मनं जिकली. त्याबरोबरच उपस्थितांपैकी मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यास उत्सुक मुलींना एक दिशा दिली आणि त्यांच्या पालकांना दिलासा दिला. व्हिवा लाऊंजमधून एक वेगळा विचार, वेगळी दृष्टी घेऊन गेलो, अशीच बहुतेकांची प्रतिक्रिया होती.
छायाचित्र : मानस बर्वे

गौरी वाघमारे अमृताचा मॉडेिलग क्षेत्रातील प्रवास ऐकून आत्मविश्वास मिळाला त्याचप्रमाणे या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी कशा प्रकारे स्वत:ला ग्रुम करायला हवं याविषयीदेखील मार्गदर्शन मिळालं. मलाही या क्षेत्रात काम करायचं आहे त्यामुळे आज तिने सांगितलेले अनुभव मला माझ्या करिअरमध्ये नक्कीच उपयोगी पडतील.

पूजा वैश्य अमृताचे स्पष्ट आणि प्रॅक्टिकल विचार खूपच प्रेरणादायी होते. मॉडेिलग क्षेत्राबद्दल जे काही गरसमज मनात होते ते दूर झाले. या क्षेत्रात क्रीएटीव्ह विचार कशापद्धतीने करण गरजेचं आहे याबद्दल अमृताकडून ऐकताना मॉडेिलगचे विविध पलू समजले.
झलक चौहान माझ्या मनात आत्मविश्वासाची नेहमी भीती असायची; परंतु अमृताला ऐकल्यानंतर ही भीती दूर झाली आहे. तिने  मनमोकळेपणाने संवाद साधल्यामुळे मॉडेिलग क्षेत्राविषयी आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरं मिळाली.

सई देशमुख सर्वसामान्य कुटुंब, मराठी माध्यम अशा वातावरणातून येऊनही एवढय़ा मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मॉडेिलग जगतामध्ये आत्मविश्वास असेल तर यश मिळू शकते ही गोष्ट अमृताच्या बोलण्यातून कळली यामुळे या स्पध्रेच्या जगात कितीही अवघड परिस्थिती असली तरी त्यावर मात कशी करावी हे आज मला शिकता आलं.

स्वप्नाली ठेब मॉडेिलगविषयी सहसा नकारात्मक दृष्टीने विचार केला जातो आणि त्यामुळे मुलींच्या मनातदेखील भीती असते; पण आज हे सगळे गरसमज दूर तर झालेच त्याचप्रमाणे या क्षेत्राविषयी कोणी नकारात्मक बोलत असेल तर आज अमृताने शेअर केलेल्या अनुभवांच्या आधारे मी त्या समोरच्या व्यक्तीचा गरसमज दूर करू शकेन हा आत्मविश्वास मला मिळाला.

श्वेता गायकवाड मी पूर्वी  कधीही अशा प्रकारच्या कार्यक्रमाला जाऊन कोणत्या मॉडेलला ऐकलं नव्हतं; पण आज अमृताचे अनुभव ऐकताना मॉडेिलगकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहायला हवं हे जाणून घेता आलं.

रूपाली कांडर मला मॉडेिलगमध्ये करिअर करायची इच्छा आहे. मॉडेिलगसाठी मॉडेल्सने नेमकं काय करायला हवं. त्यासाठी कशा प्रकारे आणि कोणत्या दिशेने तयारी करणं आवश्यक आहे याबद्दल अमृताने मुद्देसूद सांगितलं. तिने मांडलेल्या सगळ्याच मुद्दय़ांपकी मॉडेिलगसाठी खास प्रशिक्षणवर्ग काढायला हवेत हा मुद्दा मला जास्त भावला.

चताली िशदे बऱ्याचदा ग्लॅमरच्या दुनियेमध्ये इंग्रजी तुम्हाला आलंच पाहिजे असं चित्र उभं केल जातं; परंतु हा समज बदलणं कसं गरजेचं आहे आणि भाषेचं दडपण न घेता आपली कला सादर करण्यावर आपला भर असला पाहिजे या अमृताच्या विचारामुळे मनातील भाषेची भीती दूर झाली.

स्नेहा जैन आमच्या सगळ्यांचा दृष्टिकोन आज खूपच बदलला. तो अधिक सकारात्मक तर झालाच; पण मॉडेिलग हे किती चांगलं करिअर होऊ शकतं याचा विचार करायला मी अमृतामुळे शिकले.

ज्योती जैन मॉडेिलग आणि फॅशन इंडस्ट्रीचा मी अभ्यास करत असल्यामुळे आज याकडे पाहण्याची नवी दिशा मिळाली. मॉडेिलगमध्ये अनेक क्षेत्रे असतात, त्या प्रत्येक विभागामध्ये आपण वेगळं काहीतरी करून दाखवू शकतो हे अमृताने सांगितल्यावर लक्षात आलं.

आदिती चव्हाण अमृताने मिस इंडिया, मिस अर्थसारखे किताब पटकावूनदेखील तिचे पाय जमिनीवर आहेत. तिच्या बोलण्यातला साधेपणा खूप आवडला.