मुलींना नटायला भरपूर वेळ लागतो, कसा मेक-अप फासून येतात वगैरे टोमणे मुलींना हमखास ऐकावे लागतात. पण स्वतच्या सौंदर्याची (?) चिंता मुलांनाही असतेच की.. काही मुलांना बोलतं करून त्यांच्याकडून ऐकलेले हे खरेखुरे (फसलेले) सौंदर्यप्रयोग..
त्या दिवशी सहज फेसबुक सर्फ करताना मध्येच मुलींच्या नटण्यावरून केलेल्या एका ‘पीजे’ वर लक्ष गेलं. सहज म्हणून त्याच्या खालच्या प्रतिक्रिया वाचल्या तर, मुली कसा मेकअप फासतात, नटायला किती वेळ घेतात वगरे विषयांवर अनेक मुलांनी पोरकट प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता मी ‘पोरकट’ हा शब्द का वापरला याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेलच. त्यात एकमहाभाग तर, ‘अरे माझ्या गर्लफ्रेंडने त्या दिवशी अमुक क्रीम लावून स्वतच्या स्किनची वाट लावली आणि आता मला हसू येतंय तिच्या मूर्खपणावर’ असं बोलून मोकळा झाला होता. मनात आलं, बिचारीला किती त्रास झाला असेल त्या अ‍ॅलर्जीचा आणि हा हसतोय इथे.
हा विचार मनात चालतच होता आणि माझ्यातल्या ‘शैतानी दिमाग’नी डोकं वर काढलं. म्हटलं.. आवडतं आम्हा मुलींना नटायला, सजायला पण म्हणून तुम्ही मुलं हे सगळं न करता निसर्गतच परफेक्ट बनून जन्माला येत नाही ना! असं असतं तर गल्लोगली मुलांचे ब्युटी पार्लर सुरू झाले नसते आणि शाहरुख खानला फेअरनेस क्रीमची जाहिरात करावी लागली असती. पेशाने ब्युटिशियन असलेल्या रोहिणीच्या म्हणण्यानुसार तर, दर १५ दिवसाने तिचा मोठा भाऊ रविवारी तिच्याकडून फेशियल, हेअर मसाज करून घेतो. पसे तर देत नाही वर तोऱ्यात बोलतो कसा ..‘मग बहीण ब्युटिशियन असल्याचा फायदा करून घ्यायला नको का.’
बरं आता दुसरा मुद्दा असा की, आता तुम्ही बोलाल, ‘करतो आम्ही ब्युटी थेरपीज, पण म्हणून वाट्टेल ते चेहऱ्याला लावून वाट नाही लावून घेत तुम्हा मुलींसारखी.’ आता या प्रश्नाचं उत्तर शोधायचं मी ठरवलं. मित्रांमध्ये हळूहळू विषय काढला, लहानपणच्या आठवणी विचारल्या. तेव्हा हळूहळू सगळं उलगडायला लागलं. ‘हां.. लहानपणी कोल्ड क्रीम फासायचो आणि चिकट अंगाने फिरायचो घरभर.. गोरं होऊ या आशेने’ अशी उत्तरं मिळायला लागली.
वर मखलाशी होती.. ‘लहान होतो तेव्हा त्या वयात कुठे कळतंय काय करतोय, पण आता असलं काही नाही करत.’ पण अजून थोडं खोलात गेल्यावर या मुलांची एकेक गुपितं समोर यायला लागली. कॉलेजमध्ये ‘स्टुडंट ऑफ द इअर’ मिळवलेल्या वरुण मगरने सांगितलं, ‘मुळात मला िपपल्सचा त्रास खूप आहे, त्यावर मी खूप जेल क्रीम्स लावतो, पण एकदा लहान भावाने टूथपेस्टने िपपल्स जातात असं सांगितलं आणि रात्रभर टूथपेस्ट तोंडाला लावून झोपून गेलो. सकाळी उठून बघतो तर परिणाम काही नाही, पण रात्रभर त्या टूथपेस्टमुळे डोळ्यातून पाणी येत राहिलं आणि झोपेचं खोबरं झालं.’
आयटीमधल्या एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर त्याचा पराक्रम सांगितला- कॉलेजला असताना फॅशन म्हणून केस लाल रंगाने डाय केले होते त्याने. त्याचा परिणाम काय झाला म्हणून विचारलं तर म्हणाला, ‘काही नाही १५ दिवस घरातल्यांनी कोंबडा कोंबडा चिडवत हैराण केलं.’ लेखात लिहिणाऱ्याचा चेहरा दिसत नाही म्हणून नाही तर हसून हसून लाल झालेला माझा चेहरा तुम्हाला दिसला असता. बरं केसांचा विषय निघालाच आहे तर फॅशन डिझाईनचा कोर्स करणाऱ्या एकाचा पराक्रम कसा वगळता येईल. परत यानेदेखील ‘माझे नाव सांगू नकोस’ अशी ताकीद दिली होती मला. तर या साहेबांनी कॉलेजला असताना शॉकिंग निळ्या रंगाचा डाय केसांना लावायचा निर्धार केला होता. का? तर ते साहेब कॉलेजमध्ये जिच्यावर फिदा होते, त्या मुलीने त्या रंगाचे हायलाइट्स केसांना केले होते. पण नशिबाने त्याच्या फ्रेंड्सनी (त्या मुलीच होत्या बरं का) त्याला परावृत्त केलं. आज पण त्यासाठी तो आपल्या फ्रेंड्सचा ऋणी आहे.
असे कितीतरी किस्से ऐकले. दाढी येणं हा मुलांसाठी एक कळीचा मुद्दा असतो. कॉलेजला जाणाऱ्या मुलांमध्ये दाढीवरून शर्यती लागतात, स्पर्धा असते. त्याची दोन कारणं असतात. एक म्हणजे मुली पटवताना भाव वाढतो आणि आईवडिलांसमोर ‘मी आता मोठा झालोय’ असं मिरवता येतं. म्हणूनच तेलामुळे दाढीमिशी वाढते या गरसमजापोटी रात्री झोपताना हनुवटीला आणि ओठाच्या वर तेल लावणारे वीर कमी नाहीत.
टीव्हीवरील जाहिरातींना भुलून ब्युटी ट्रीटमेंट्सवर हजारो रुपये खर्च करण्यात मुलंही मागे नसतात बरं का. माझ्या एका मत्रिणीच्या सांगण्यानुसार, तिच्या मित्राने गोरं होण्यासाठी स्काय शॉिपगवरून ४००० रुपयांचं ब्युटी कीट मागवलं होतं आणि अजूनही तो त्याने किती फरक पडला चेहऱ्यावर हे शोधतोय. तर वेब डिझाईनर आदित्यने मला सांगितलं की, ‘मी डॉक्टरकडे गेलेलो स्किनवर उपचार करायला. कारण मला ऑइली स्किनचा त्रास होता. पण त्यांनी इतक्या गोळ्या आणि पथ्य दिलं की मी हैराण झालो होतो. काही दिवस नेमानं पाळलं नंतर सोडून दिलं. तुम्ही मुली हे सगळं कसं काय करता खरंच पाया पडलं पाहिजे तुमच्या.’  हे आणि असे अनेक अनुभव मला ऐकायला मिळाले. बरं ‘वरील पात्र काल्पनिक आहेत आणि वास्तवशी याचा काही संबंध नाही. आढळल्यास योगायोग समजावा’ असं मी बिलकुल म्हणणार नाही. कारण ही मुलंही खरी आहेत आणि त्यांचे अनुभवदेखील. सो यापुढे मुलींना हसण्याआधी मुलांनो, तुम्ही केलेल्या फजित्या आठवा. कारण इथे मी काही जणांचे अनुभव दिले असले तरी १० पैकी ९ मुलांनी हे किंवा असे काही प्रकार नक्कीच केलेले असतील. काय बरोबर ना?
छाया : गार्गी गीध