गायत्री हसबनीस

आंतरराष्ट्रीय फॅशन सोहळय़ांना या वर्षीपासून नव्याने धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. यंदा ‘लंडन फॅशन वीक’ १८ ते २२ फेब्रुवारी आणि ‘न्यूयॉर्क फॅशन वीक’ ११ ते १६ फेब्रुवारी दरम्यान पार पडला. या दोन्ही फॅशन वीकमध्ये मोनोक्रोमपासून ते डार्क शेड्सपर्यंत बरेच फॅशन ट्रेण्ड्स चर्चिले गेले. या सगळय़ात महत्त्वाची गोष्ट ठरली ती म्हणजे फॅशन शोशी प्रत्यक्ष ग्राहकांचे जोडले जाणे. आभासी शोज ही करोना काळाची गरज होती. मात्र प्रत्यक्षात फॅशनप्रेमी आणि फॅशन कलेक्शनच्या तारा जुळणे महत्त्वाचे आहे याची नांदी या आंतरराष्ट्रीय फॅशन वीकने करून दिली आहे.

International Institute of Population Sciences Mumbai Bharti For Research Officer and Junior Research Office post
IIPS Mumbai Bharti 2024: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत भरती; ५५ हजारांपर्यंत पगार, असा करा अर्ज
bse sensex rise 599 points to settle at 73088
तेजीवाल्यांची पुन्हा सरशी; तणाव निवळल्याने सेन्सेक्सची सहा शतकी दौड
Mumbai, Cyber ​​fraud, Taddeo,
मुंबई : ताडदेवमधील आंतराष्ट्रीय शाळेची ८७ लाखांची सायबर फसवणूक, सायबर पोलिसांना ८२ लाख रुपये गोठवण्यात यश
pune city, sales of electric vehicles, last year, Gudi Padwa festival
पुणे : कुणी इलेक्ट्रिक वाहन घेता का? गेल्या वर्षीपेक्षा पाडव्यानिमित्त विक्रीत तब्बल ८५ टक्क्यांची घट

सलग तीन वर्षे करोनाने झाकोळल्यामुळे बाजारात कपडय़ांचे नवे नवे ट्रेण्ड्स दाखल होणे जवळपास ठप्प झाले आणि त्यातूनच फॅशनमध्ये नवं काय? याची चाचपणीही सामान्यांपर्यंत पोहोचणे अवघड होऊन बसले. ट्रेण्डसेटर फॅशन ज्या रॅम्पवरून येतात, तो रॅम्पचा सोहळा राष्ट्रीय काय आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही सर्वच सीझनमध्ये डिजिटल पद्धतीने पार पडला. आत्तापर्यंत डिजिटल पद्धतीने फॅशन शो झाले असले तरी त्यामुळे प्रत्यक्ष बाजारपेठेशी जोडून घेणे अवघड गेले. त्यामुळे यंदा प्रत्यक्ष फॅशन शो करण्यावर सगळय़ाच मोठय़ा फॅशन वीकने भर दिला आहे. याचा प्रभाव आपल्यावरही पडला असून येणारा लॅक्मे फॅशन वीकही प्रत्यक्ष होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

नुकताच न्यूयॉर्क फॅशन वीक, लंडन फॅशन वीक संपन्न झाला. आता लवकरच मिलान फॅशन वीक आणि पॅरिस फॅशन वीक हे दोन मोठे जागतिक फॅशन सोहळे येऊ घातले आहेत. भारतातील सर्वात मोठा फॅशन सोहळा म्हणजे लॅक्मे फॅशन वीकही लवकरच फॅशनप्रेमींच्या भेटीला येणार आहे. डिजिटल पद्धतीने पार पडलेल्या शोच्या माध्यमातून फॅशन कलेक्शन्स फॅशनप्रेमींपर्यंत पोहोचले खरे.. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्याउलट या वर्षांच्या सुरुवातीलाच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय फॅशन वीकमधून फॅशनप्रेमींना वापराच्या दृष्टीने सोईस्कर, कम्फर्ट देणारे आणि ट्रेण्डी कलेक्शन्स सादर झाले आणि त्याला उपस्थितांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या शोजमधून मोनोक्रोमपासून ते डार्क शेड्सपर्यंत विविध ट्रेण्ड्स चर्चेत राहिले. ओव्हरसाईज कपडय़ांना जगभर अद्यापही मागणी असल्याने त्या कलेक्शनबरोबर तरुणांना आकर्षित करतील असे शिमर, ग्लिटर आऊटफिट्स सर्वात जास्त चर्चिले गेले.

ब्युटी ट्रेण्ड्स –

आत्तापर्यंत झालेल्या आंतरराष्ट्रीय फॅशन शोजमध्ये लाऊड मेकअप अधिक पाहायला मिळाला. त्यातून ओठांवर लाऊड रंगांच्या लिपस्टिकचा ट्रेण्ड अधिक होता. अमेरिकेत लाल रंगाच्या लिपस्टिकला यंदा अधिक पसंती दिली गेली. त्याचसोबत स्मोकी आईज मेकअप आणि त्या पद्धतीच्या छटा डोळय़ांभोवती अधिक रंगवल्या गेल्या. डोळय़ांसाठी फिकट आणि गडद रंग, असे दोन्ही पद्धतीचे लाऊड मेकअप ट्रेण्ड्स पाहायला मिळाले. अनेक फॅशन जाणकारांनी या मेकअप ट्रेण्डला अत्याधुनिक मेकअप म्हणून मान्यता दिली आहे. खरंतर स्मोकी आईजचा फंडा या सीझनलाही पाहायला मिळेल, असे भाकीत मागच्या सीझनमध्ये वर्तवले गेले होते. मागच्या सीझनलाही लाऊड मेकअप ट्रेण्ड्स पाहायला मिळाले होते. तर वोगकडून असेही सांगण्यात आले की डार्क शेड्स यंदा अधिक ट्रेण्डी असून फॅशन डिझायनर्सनी काळा रंग त्यांच्या मेकअप लुकमध्ये ठेवला होता. नव्वदच्या दशकातील मेकअप ट्रेण्ड या वेळी पुन्हा पाहायला मिळाला. लंडन फॅशन वीकमधून तर भुवयाही रंगवण्याचा ट्रेण्ड पाहायला मिळाला. इथे आय शेड्सपेक्षा आय लायनरला अधिक प्राधान्य दिले गेले होते.

गाऊन्सची पुन्हा चलती

गाऊन्स हे कायम ट्रेण्डमध्ये असतातच. पाश्चात्त्य संस्कृतीनुसार हा ट्रेण्ड वजा होणारा नाही हे निश्चित आणि हेच लक्षात घेऊन यंदाही फॅशन शोजमध्ये त्याचे वर्चस्व पाहायला मिळाले. गाऊन्सचे विविध  प्रकारांतील पेहराव पाहता लक्षवेधी असा कॅटवॉक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाहायला मिळाला. हार्पर्स बाजारनुसार लंडनमध्ये १९३० काळातील ग्लॅमरस लुक पुन्हा एकदा पाहायला मिळाले. फॅशन डिझायनर सुप्रिया लेले यांनी बॉडी फिट कपडय़ांचे कलेक्शन सादर केले. त्यातही लंडनमध्ये शिमर आणि फ्लोरल गाऊन्सचा फंडा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. तर अमेरिकन फॅशनमध्ये लेदर आणि फ्लोरल फॅब्रिकचा वापर सर्वाधिक होता. अमेरिकेत मॅक्सी स्कर्टस, ट्रेची कॉट्स आणि फेदर जॅकेट पाहायला मिळाले. इथेही काळा आणि पांढरा या दोनच रंगांवर प्रामुख्याने भर दिला गेला होता. 

गुलाबी रंगाचा सोहळा

सप्तरंगी कपडे फॅशन शोजमधून वगळले गेले नसले तरी गुलाबी रंगाला लंडन आणि अमेरिकेत विशेष चलती होती. त्यातून वेस्टर्न आऊटफिट्समध्ये वेगवेगळय़ा कपडय़ांमध्ये गुलाबी रंगाचा वापर केल्याचे पाहायला मिळाले. लांबलचक पॅन्ट्सपासून ते जॅकेट आणि गाऊन्समध्ये खासकरून वूमन्स वेअरमध्ये हा रंग अगदी योग्य पद्धतीने वापरला गेला. फॅशन जाणकारांच्या मते हा रंग आजही अनेक मोठय़ा आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रॅण्ड्सचा आवडीचा रंग आहे.

शिमरची पुन्हा एकदा बाराखडी

शिमर सिक्विन्सपासून ट्रान्सपरन्ट शिअर्सपर्यंतचे ट्रेण्डस फॅशन वीकमध्ये प्रभावी राहिले. ब्रुनोक्स आणि बान्को हा ब्रॅण्ड यंदा ग्लिटरने भरलेले पार्टीवेअर घेऊन आला होता. या वेळी मोठय़ा प्रमाणात शिमर आऊटफिट्सचे कलेक्शन फॅशन वीकमधून सादर झाले. टेक्नॉलॉजीयुक्त आलिशान जीवनशैलीचे प्रतिबिंब फॅशनमधून उमटवण्याचा प्रयत्न डिझायनर्सनी केला. खरंतर या आऊटफिट्सचे स्वरूप हे मोठे म्हणजे ओव्हरसाईज प्रकारातील होते त्यामुळे पुन्हा एकदा त्याची अधिक चर्चा झाली. शिमरचे कपडे हे व्यवहारातही यावेत अशाप्रकारे प्रयत्न डिझायनर्सकडून झाले आहेत हे नक्की.

जागतिक स्तरावर हे फॅशन सोहळे वेगळय़ा पद्धतीचे होतील असे काहींचे म्हणणे होते. यंदा फॅशन शोमधून मोठे सेलेब्रिटीही फार कमी दिसले. स्किन कलर आणि सौंदर्यप्रमाणाच्या योग्यतेनुसार कपडे कसे असावेत याची काळजी आणि त्या पद्धतीचे स्टायिलग यंदा केलेले पाहायला मिळाले. भारतात कदाचित नक्कीच पुन्हा एकदा गाऊन्सची चर्चा होईल याची दाट शक्यता आहे. सध्या वेडिंग सीझनही भारतात जोरदार असल्याने आंतरराष्ट्रीय फॅशन सोहळय़ांवरून प्रेरित होऊन भारतीय डिझायनर तसे कपडे आणू शकतात. पॅरिस आणि मिलान फॅशन वीकचाही इन्फ्लूएन्स आपल्याकडच्या फॅशन वीकमध्ये पाहायला मिळेल यात शंका नाही.

viva@expressindia.com