style-logoप्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘NIFT’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. हॉलिवूड सेलेब्रिटींसाठीही त्यांनी डिझायनिंग केलंय. ‘हॅपी जर्नी’सारख्या मराठी चित्रपटाची वेशभूषा त्यांनी केली आहे. पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमित यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न viva@expressindia.com या मेलवर पाठवा.

नमस्कार, मी वैष्णवी, मला माझ्या बहिणीच्या लग्नात आपल्या नेहमीच्या अनारकली किंवा साडी या ड्रेसिंगपेक्षा काही तरी वेगळं करायचं आहे. माझा असा समज आहे की, बऱ्याचशा देसी किंवा एथनिक कपडे प्रकारात मी बुटकी आणि जाडी दिसते. माझी उंची ५ फूट आहे आणि वर्ण गोरा आहे. तेव्हा मी जाड दिसणार नाही पण मला सेरीमोनिअल लुकही मिळेल असं काही तरी सुचवू शकाल का?

Twinkle Khanna reacts on performing in Dawood Ibrahim party
ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…”
Rohit Sharma Returns As Mumbai Indians Captain In Mid Match
Video: रोहित शर्मामधील ‘कर्णधार’ परत आलाच; मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या षटकात हार्दिकला बाजूला सारून काय घडलं?
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Why stress test of mutual fund is important
तुमच्या म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट काय सांगते? म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट महत्त्वाची का?

हाय वैष्णवी,
गुड टू हिअर यू. आपल्याकडच्या लग्नसमारंभाचं उत्सवी स्वरूप लक्षात घेता, अशा प्रसंगी चमकदार दिसण्यासाठी काही तरी स्पेशल ड्रेसिंग तो बनता है. तू म्हणत्येस तेही योग्यच आहे, तुझ्या उंची आणि बांध्याला साडी किंवा अनारकली कपडे प्रकार नक्कीच बोजड दिसतील. तेव्हा काही तरी वेगळा विचार करायला हवा. मुख्य म्हणजे तुझ्या ड्रेसेसची नेकलाइन नेहमी ‘व्ही’ आकारातलीच ठेव. यामुळे तुझी मान उंच आणि खांदे अरुंद असल्यासारखे वाटतील. एरवीसुद्धा ड्रेसवरचं डिझाइन, ड्रेसच्या कापडावरचं प्रिंट, रेषा, नाजूक आकारात आणि उभ्या असतील, असेच ड्रेस किंवा कापड यांची निवड कर. यामुळे पाहणाऱ्याला, तू आहेस त्यापेक्षा उंच आणि तुझा बांधाही निमुळता, बारीक वाटेल. आडव्या रेषा, प्रिंट, मोठी डिझाइन्स असलेले ड्रेसेस, तुला कटाक्षाने टाळायला हवेत, कारण या ड्रेस प्रकारात आपण आहोत त्यापेक्षा अधिक बुटके आणि जाड दिसतो. आता लग्नप्रसंगाच्या ड्रेसिंगबद्दल बोलायचं तर, सिल्कच्या कापडाचा, साधा ए लाइन प्रकारचा, मध्यम फिटिंगचा, अँकल लेन्थ कुर्ता (सध्या ही स्टाइल ‘इन’ आहे). आणि त्याखाली विरुद्ध रंगाचा चुडीदार तुझ्यासाठी एकदम मस्त वाटेल. एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे सलवार किंवा पतियाला सलवार या प्रकारात असे लांब कुर्ते अजिबात वापरू नकोस. पतियालामध्ये आपला बांधा अजून रुंद वाटू शकतो, तेव्हा हे प्रकार तू टाळलेलेच बरे.
कुर्त्यांवरील व्ही नेक पासून खालपर्यंत नाजूक चमकदार शो बटन्सची लाइन किंवा एखादी भरतकाम असलेली बारीकशा नक्षीची उभी रेघ, ड्रेसला ग्रेसफुल आणि उत्सवी लुक देऊन जाईल आणि ड्रेसचा व्हर्टिकल इफेक्टसुद्धा वाढवेल. ड्रेसवरचा दुपट्टा, जॉर्जेट किंवा शिफॉन अशा सुंदर फॉल असणाऱ्या कापडाचाच असलेला चांगला. आता पादत्राणांचा विचार व्हायलाच हवा नाही का? तेव्हा हाय हिल्स आर मस्ट. यामुळे, तू छान उंच दिसशील. अर्थात हाय हिल्स घालून तुला वावरणे सहज शक्य होणार असेल तरच. सर्वात शेवटी अ‍ॅक्सेसरीजबद्दल बोलू या. तुझ्या ड्रेसला सूट होतील असे लहानसे, सुंदर लाइटवेट दागिन्यांचे प्रकार, तुला नक्कीच घालता येतील. दागिने किंवा अ‍ॅक्सेसरीज कमी असतील तितक्या चांगल्या, यामुळे तुझा लुकही सुबक, लहानसा दिसायला मदत होईल. सो वैष्णवी, या सगळ्या टिप्स फॉलो केल्यास की तुझ्या बहिणीच्या लग्नात तू ग्रेट & गॉर्जियस दिसणार हे नक्की.

अमित दिवेकर
अनुवाद – गीता सोनी
– viva.loksatta@gmail.com