गायत्री हसबनीस
फॅशनेबल कपडे घालूनसुद्धा काहीतरी चुकल्यासारखे वाटले तर मग नक्की आपण परफ्यूम मारला नाहीये हे लक्षात यायला फारसा वेळ लागत नाही. पूर्वी जशी सुगंधित द्रव्यं कपडय़ांवर मारली जायची तशीच ती आहेत आता ‘परफ्युम्स’च्या रूपात. त्यातही हल्ली विविध फ्रॅगरन्स असतात. सध्या परफ्यूम, डिओड्रन्ट यांचा ट्रेण्ड आहे. त्यामुळे या महिन्यात उन्हातही सुगंधित राहण्यासाठी काही आकर्षक परफ्यूमचा आपण आता विचार करूया.
* सध्याच्या जनरेशनला स्ट्राँग फ्रॅगरन्स आणि माइल्ड फ्रॅगरन्सही आवडतात. यंदा मुलांसाठी ‘वाईल्ड स्टोन’मध्ये ‘अल्ट्रा सेन्सेश्युयल’, ‘हायड्रा एनर्जी’ असे परफ्यूम्स मिळतील. २९९, ३००, २५६ रुपयांपासून त्यांची सुरुवात आहे. तर त्यांच्यासाठी परफ्यूमच्या फ्रॅगरन्समध्ये टॉप नोट फ्रॅगरन्स लेव्हेंडर, बर्गामोट, लेमन आणि पेटीटग्रीनमध्ये आहे तर मीडल नोट फ्रॅगरन्स ऑरेंज, ब्लॉसम, लिली, ऑफ द व्हॅली, कॉरिएन्डर, ज्युनिपर बेरीमध्ये आहे. बेस नोट फ्रॅगरन्स रोझवूड, सॅन्डलवूड, व्हाईट मस्क, अम्बर हेही उपलब्ध आहेत. तसेच ‘अल्ट्रा सेन्सेश्युयल’, ‘हायड्रा एनर्जी’ याव्यतिरिक्त ‘टेन्डर परफ्यूम’, ‘अॅक्वा फ्रेश’, ‘नाईट रायडर’ परफ्यूमसह बाजारात यंदा मुलांसाठी परफ्यूम्सची विविध रेंज आहे. १५६ ते ५८५ रुपयांपासून हे डिओड्रन्ट मिळतील.
* स्प्रेमध्ये कोलोजन स्प्रे मुलांसाठी आहे, ४९९ रुपयांपर्यंत त्यांची किंमत आहे. तर मुलींसाठी डव्ह, निव्या यांचे बॉडी स्प्रे आहेत. ‘डव्ह’कडून मुलांसाठी ‘मेन केअर’ तर मुलींसाठी ‘गो फ्रेश’ परफ्यूम्स उपलब्ध आहेत. यात प्रोमोग्रेनेट, ग्रीन टी, ककम्बर, लेमन असे काही फ्रॅगरन्स आहेत. ‘एन्गेज’तर्फे बॉडी परफ्यूम्स १४९, २५० रुपयांपासून उपलब्ध आहेत.
* ‘स्किन टायटन’ या ब्रॅण्डकडून लेडीज परफ्यूम आहेत. यात साधारण शिअर, न्यूड, रॉ, स्टीले, व्रग आणि कॅलेझेट असे सुगंधित परफ्यूम्सचे पर्याय आहेत. हे तुम्हाला ४३४, १११२ आणि १५९० रुपये इतक्या खर्चीक दरात मिळतील. ‘फॉग’चा ‘मेक माय डे’ परफ्यूम ३९९ रुपयाला आहे. ‘नाईकी’कडून ‘कॅज्युअल’ ४४९ रुपयात मिळेल तर ‘एन्वी’चा ‘ब्लश’ परफ्यूम ४०० रुपयांपर्यंत आहे.
* ‘झारा’ परफ्यूममध्येही ‘फ्रुटी’, ‘फ्लोरल’, ‘रेड व्हेनिला’ असे फ्लेवर आहेत. तसेच ‘यार्डली’कडून ‘रॉयल डायमंड’, ‘शनेल’कडून ‘टेन्डर’ असे परफ्यूम्स आहेत. जे प्रोफेशनल आणि कॅज्युअल वेअरवर वापरण्यायोग्य आहेत. त्यांची किंमत ९९९ रुपयांपासून ते २५९० रुपये इतकी आहे. ‘स्पिंज’, ‘अॅवोन’चे परफ्यूम्स तर तुम्हाला नक्कीच स्वस्तात मिळतील. १४०-३०० रुपयांपर्यंत यांचे सिंगल पॅक्स आहेत तर ३५६-५४२ रुपयांपर्यंत कॉम्बो पॅक्स आहेत. ‘डेन्वर’, ‘आदिदास’, ‘अॅडिक्शन’ या कंपन्यांकडून मुलांसाठीही काही पॅक्स आहेत, जे ५०० रुपयांपासून सुरू आहेत.
* ‘गुड गर्ल’, ‘सी. के. वन’, ‘वर्सेस’ या इतर ब्रॅण्डकडूनही १,००० ते २,०००च्या घरात परफ्यूम्स मिळातील. ‘पार्क अॅव्हेन्यू’कडून ‘एलेवेट’ फ्रॅगरन्स १४६, ४४३, ४९३ रुपयांपासून मिळेल. ‘एले’कडून तुम्हाला टॉप नोटमध्ये ‘फ्रिसिया’, ‘अॅपल’, तर ‘मस्क’, ‘बेन्झोइन’ आणि बेस नोटमध्ये ‘लोटस आणि पिऑनी’ असे विविध प्रकारचे फ्रॅगरन्स आहेत. १७९९, १९९९, १११० अशा त्यांच्या किमती आहेत. या सगळ्या परफ्यूम्सवर २२ ते २८ टक्के सूट आहे. सर्व परफ्यूम्स खरेदी करण्यापूर्वी प्रॉडक्ट ऑथेंटिके ड आहे की नाही ते जरूर पाहा.
viva@expressindia.com