डॉ. अपूर्वा जोशी

मागील लेखात आपण विपणन योजना म्हणजेच मार्केटिंग प्लॅन तयार करणे आणि त्यानुसार काम करणे या मुद्दय़ाला सुरुवात केली होती. मार्केटिंग प्लॅन टेम्पलेट कशी वापरावी यामध्ये काही प्रमुख मुद्दे होते जसे ध्येय, चालू काळातलं मार्केटिंग अ‍ॅनालिसिस आणि ऑडिट, कॉम्पिटिटिव्ह मार्केट अ‍ॅनालिसिस आणि ‘स्वॉट’, टार्गेट मार्केट्स, आवश्यक मार्केटिंग मटेरिअल, मार्केटिंग चॅनल्स या सगळ्या गोष्टींचा विचार महत्त्वाचा ठरतो.

मार्केटिंग प्लॅन पूर्णत्वाला नेताना बदलत्या काळाप्रमाणे आणखी काही घटकांचा समावेश आवश्यक आहे.

मार्केटिंग कॅम्पेन्स

काय काय प्रकारचे मार्केटिंग कॅम्पेन्स बाजारात उपलब्ध आहेत जे तुमच्या व्यवसायाला पूरक होतील?  कॅम्पेन्ससाठी अंदाजे थीम्स, पीच किंवा टॅगलाइन्स कोणत्या वापरता येतील, यावर बारकाईने विचार करा.

स्केलिंग (वाढ)

तुम्ही वरील सर्व गोष्टींपैकी जास्तीत जास्त गोष्टींवर प्रभुत्व मिळवाल तेव्हा पुढच्या पायरीत २—३ मार्केटिंग चॅनेल्स कोणते  असतील? वाढणारा परिणाम आणि नफा याची तुलना करून तुम्ही हे मार्केटिंग प्रयत्न आणखी कसे वाढवाल?

बजेट

पुढील ३ ते ६ महिन्यांमध्ये या मार्केटिंग प्रयत्नांसाठी तुमच्याकडे कोणते बजेट आहे? हा स्टार्टअप मार्के टिंग प्लॅन टेम्पलेटच्या घटकांपैकी असा एक घटक आहे जिथे तुम्हाला खरोखरच बारीक तपशिलात जाऊन विचार करणं आवश्यक आहे. तुमच्याकडे बजेट नसेल तर तुमच्या व्यवसायासाठी पुढचे प्रमुख टप्पे गाठेपर्यंत तुम्हाला किती पैसे गुंतवणूक म्हणून उभे करावे लागतील? तुम्हाला तुमच्या मार्केटिंग टीमसाठी किती पैसे बाजूला काढून ठेवावे लागतील आणि जाहिरातीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर थेट किंमत किती, या गोष्टींचा समावेश करावा लागेल.

अंमलबजावणी (इम्प्लिमेंटेशन)

हा मार्केटिंग प्लॅन अमलात आणण्याचे काम कोण करेल? कोण याचे मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन करेल? विविध स्तरांवरची कामे कोण कसे करणार आहे? ही कामं कोणत्या स्तरावर म्हणजे किती व्हॉल्युममध्ये केली जातील? तुमच्याकडे टीम नसल्यास, टीम कशी बनवता येईल, मार्केटिंगसाठी लोक  कसे शोधता येतील,  या सर्व प्रश्नांची उत्तरं जेव्हा मिळवायला सुरुवात कराल तेव्हा याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होईल याचं चित्र तुम्हाला स्पष्ट होईल.

स्टार्टअपमध्ये मार्केटिंग इतकोच महत्त्वाचा असतो तो म्हणजे तुलनात्मक बाजार विश्लेषण (कंपॅरिटिव्ह मार्केट अ‍ॅनालिसिस). नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी स्पर्धा आणि बाजाराचे विश्लेषण हे सर्वात महत्त्वाचे भाग आहेत. तुलनात्मक बाजार विश्लेषण करताना स्टार्टअप्ससाठी दोन महत्त्वाचे विचार समाविष्ट असतात :

१) या विश्लेषणामुळे तुम्ही जी बाजारपेठ पाहताय ती पाठपुरावा करण्यायोग्य आहे की नाही याचं व्हॅलिडेशन मिळेल. व्हॅलिडेशन कसं मिळेल, तर संभाव्य बाजारपेठेचा आणि बाजाराचा वाटा किती मोठा आहे आणि येथे व्यवसायाची खरी संधी आहे हे जर तुमचं विश्लेषण (अ‍ॅनालिसिस) दाखवून देत असेल तर व्हॅलिडेशन मिळालं असं समजावं.

२) हे विश्लेषण या बाजारात तुमचा स्पर्धात्मक फायदा (कॉम्पिटिटिव्ह अ‍ॅडव्हान्टेज)किती हे  दर्शवेल.  स्पर्धात्मक फायदा कसा पहायचा? तर यामध्ये प्रतिस्पर्धी म्हणजे कॉम्पिटिटर्सचे विश्लेषण करून, त्यांच्या सामथ्र्य (स्ट्रेंथ) आणि दोषांची (विकनेस) तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसबरोबर तुलना के ली तर भविष्यातील स्पर्धेची जोखीम लक्षात घेऊन तुम्हाला स्पर्धात्मक फायदा काढता येईल.

कोणत्याही स्टार्टअप व्यवसायासाठी घडविणारे किंवा तोडणारे हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. हे घटक येथे व्यवसायाचा खरोखरच टिकाव लागेल का? आणि वृद्धीची आशा आहे की नाही ते ठरवतील. यामुळे अजून काय साध्य होईल तर हा प्रयत्न तुमच्या बिझनेस मॉडेल आणि थेट ब्रँडिंगला मदत करेल; वित्तपुरवठा आणि गुंतवणूकदार, तसेच सल्लागार आणि उत्तम टॅलेंट मिळविण्यात हा एक्सरसाइज महत्त्वपूर्ण ठरेल.

तुमच्या तुलनात्मक बाजार विश्लेषणाची तयारी :

मजबूत आणि प्रभावी तुलनात्मक बाजार विश्लेषण टेम्पलेट बनवण्याचे दोन भाग आहेत.

१) बाजार आणि स्पर्धेबद्दल बा (एक्स्टर्नल) डेटा गोळा करणे

२) तुमचा स्वत:चा अंतर्गत (इंटर्नल) डेटा गोळा करणे आणि नियोजन करणे

तुलनात्मक बाजार विश्लेषण टेम्पलेटमध्ये स्टेप बाय स्टेप जाताना तुम्ही हे करू शकता. जर असा सर्व डेटा आगाऊ संकलित करून ठेवला असेल तर टेम्पलेटमध्ये प्रत्येक सेक्शन भरण्यासाठी तुम्हाला जेव्हा सूचित केले जाईल तेव्हाच तुम्ही या गेममध्ये एक पायरी सर्वांच्या पुढे राहू शकाल.

मार्केट डेटा गोळा करण्याचे बरेच मार्ग आहेत :

१) वेबवर सार्वजनिकरीत्या उपलब्ध उद्योग आणि कंपनी डेटा

२) बाजार संशोधन अहवाल (मार्केट रिसर्च रिपोर्ट) खरेदी

३) नवीन संशोधन चालू करणे (मोठय़ा कंपन्या, फ्रीलान्सर किंवा इन—हाऊस सहाय्यक वापरून)

४) ‘डू—इट—युवरसेल्फ’ मार्ग घ्या. जो कदाचित स्वस्त वाटेल, परंतु तो सदोष, पक्षपाती आणि अपूर्ण असू शकतो.

आपल्या तुलनात्मक बाजार विश्लेषण टेम्पलेटमध्ये काय समाविष्ट करायला हवे त्याची माहिती खाली दिली आहे.

आढावा (ओव्हरवू)

संक्षिप्त आढाव्यासकट प्रारंभ करा. या दस्तावेजात तुमचे बाजार, मिशन, सामान्य बाजारातील लँडस्केप आणि निकाल किंवा उद्देश नमूद करा.

उद्योग वर्णन (इंडस्ट्री डिस्क्रिप्शन)

उद्योग म्हणजे काय? एकूण बाजारपेठ किती मोठी आहे? हा बाजार कसा ट्रेंडिंग आहे हेही तुम्ही यात समाविष्ट करू शकता. तो वाढत असल्याचे दर्शविणारे कोणते अधिकृत रिसोर्सेस आहेत? या जागेच्या सध्याच्या अकार्यक्षमतेच्या दृष्टीने तुम्ही ज्या समस्येचे निराकरण करीत आहात त्या मुद्दय़ाबद्दल बोलू शकता. तुमचे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची विश्वासार्हता लक्षात यावी यासाठी तुम्ही त्यासंदर्भातील सर्व डेटा, स्रोत आणि संशोधनाचे दुवे संकलित करण्याचे सुनिश्चित करा.

क्रमश:

viva@expressindia.com