शॉपिंग हा वीकपॉइंट असणाऱ्या अनेकजणी असतील. आपल्याकडे लेटेस्ट फॅशनचे कपडे, अ‍ॅक्सेसरीज असलेच पाहिजेत असं सगळ्यांनाच वाटतं. पण कुठली फॅशन इन आहे, कुठे चांगला चॉईस मिळेल आणि बेस्ट डील काय असू शकेल हे कळत नाही. व्हिवाच्या फॅशन रिपोर्टर त्यांना आवडलेल्या गोष्टी या सदरातून तुमच्याशी शेअर करतील. या वीकएंडच्या  शॉपिंगसाठी व्हिवा पीक ऑफ द विक किती उपयुक्त ठरतंय, आम्हाला  नक्की कळवा.
  प्रिंटेड स्लॅक्स
काही दिवसांपर्यंत हॅरम पँट्स खूप फॅशनमध्ये होत्या. आता त्यांची जागा प्रिंटेड स्लॅक्सनी घेतली आहे. या स्लॅक्स वापरायला खूप कंफर्टेबल आहेत. वर एखादा कॅज्युअल टॉप घातला की, एकदम स्मार्ट लुक येईल.

यूएसपी : कंफर्टेबल तरीही ट्रेंडी
ठिकाण : झारा, लोखंडवाला मार्केट
किंमत : १२०० रुपये
पेस्टल कलर शर्ट
एखाद्या ब्राईट कलर डेनिमवर किंवा स्कर्टवर घालायला पेस्टल कलर शर्ट हवाच. पेस्टल कलरची फॅशन कधीच आऊट ऑफ डेट होत नाही. पेस्टल कलर कुठल्याही ऑकेजनला घालता येतात. त्यातून कॉटन असल्यामुळे एकदम कंफर्टेबल वाटतं
यूएसपी : पेस्टल कलर आणि कॉटन
ठिकाण : बांद्रा हिल रोड
किंमत : ३०० रुपये

अ‍ॅझटेक प्रिंट पेप्लम
टॉप्सना खाली झालर किंवा फ्लेअर असेल तर त्याला पेप्लम म्हणतात. असे पेप्लम टॉप्स सध्या बरेच चलतीत आहेत. एखाद्या प्लेन स्लॅक्सवर हे टॉप एकदम सूट होतात. यातून नवी स्टाईल केल्याचं समाधान मिळतं आणि लेटेस्ट लुकसुद्धा मिळतो.
यूएसपी : ब्राईट कलर आणि
अझटेक प्रिंट कॉम्बिनेशन
ठिकाण : फॉरएव्हर न्यू
किंमत : १८०० रुपये

नेकपीस विथ स्टोन
ब्राँझ टेक्शचरच्या इतर अ‍ॅक्सेसरीजबरोबर परफेक्ट मॅच होणारा नेकपीस. वेगळ्या स्टाईलमुळे लक्षवेधी वाटला. मधला निळा स्टोन बाजूच्या डिझाईनची नक्षी खुलवतोय.
अशा मोठय़ा नेकपीसची सध्या चांगलीच फॅशन आहे. बोल्ड फॅशन स्टेटमेंट या नेकपीसमधून व्यक्त होतं.
यूएसपी : ब्राँझमधला बोल्ड पॅटर्न
ठिकाण : कुलाबा कॉजवे
किंमत : ५०० रुपये

ब्राँझ टेक्चर्ड बँगल्स
ब्राँझ टेक्श्चर सध्याची इन थिंग आहे. कुठल्याही प्रकारच्या आउटफिट्सवर या बांगडय़ा सूट होतील. यांचा पॅटर्न आणि कमी -जास्त जाडीचं कॉम्बिनेशन थोडं हटके वाटलं. वेस्टर्न आऊटफिट्सवर आणि ट्रॅडिशनल इंडियन वेअरवर मिक्स अँड मॅच करून या बांगडय़ा मस्त दिसतील.
यूएसपी : ब्राँझ टेक्श्चर
ठिकाण : लिंकिंग रोड, बांद्रा.
किंमत : १०० ते १५० रुपये.

फीदर इअररिंग
अशा प्रकारे पिसाच्या इअररिंग्ज सध्या खूप फॅशनमध्ये आहेत. अनेक मुली अशी कानातली घालताना दिसतील. फॅशनेबल लुक हवा असेल तर ही इअररिंग घातली की काम झालं. याखेरीज काही अ‍ॅक्सेसरीजची गरज वाटणार नाही. फीदर इअररिंगमधले ही दोन थोडी वेगळी डिझाईन वाटली.
यूएसपी : फीदरमधली वेगळी डिझाईन आणि ब्राईट कलर
ठिकाण : कुलाबा कॉजवे, बांद्रा हिल रोड
किंमत : १५० ते २५० रुपये