मेक-अप किंवा रंगभूषा म्हणजे काय? चेहऱ्याच्या नसíगक ठेवणीमधील उणिवा कमी करणे आणि चांगल्या गोष्टी अधिक आकर्षक करणे. रंग, खोली, अंतर, समतोल, दिशा आणि आकार या गोष्टी लक्षात ठेवूनच मेक-अप केला जातो. मागील लेखात आपण आय शॅडोजचे मुख्य प्रकार बघितले. मुळात डोळ्यांच्या आकाराला साजेसा मेक-अप असला पाहिजे हे महत्त्वाचं सूत्र लक्षात ठेवले पाहिजे. त्यासाठीच आजच्या लेखात डोळ्यांचे  वेगवेगळे आकार आणि अशा डोळ्यांसाठी विशिष्ट अशी मेक-अपची पद्धत बघू या. आपल्या डोळ्यांचा आकार कोणता ते आधी बघा आणि त्यानुसारच मेक-अप केला तर परिणामकारक दिसतो.

बदामी डोळे (Almond Eyes)
नावाप्रमाणेच डोळ्यांचा आकार  बदामासारखा असतो. डोळे समांतर असून डोळ्यांच्या बाहेरील कडा थोडय़ा वरच्या दिशेला असतात.  मेक-अपसाठी आदर्शवत असा आकार मानला जातो. कुठल्याही लूकसाठी सुयोग्य आकार आहे.
मेक-अप : सर्वात आधी फिकट मॅट शेड भुवईच्या हाडावर लावा. फिकट रंगाचे शिमर संपूर्ण पापणीवर लावावे. डोळ्यांचा आकार थोडा मोठा दिसण्याकरिता जाडसर आयलाइनर लावा किंवा मॅट, गडद आय शॅडो लावले तरीही चालेल.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

गोल डोळे  (Round Eyes)
गोल डोळे बदामी आकाराच्या डोळ्यांपेक्षा आकाराने मोठे व गोलसर असतात. डोळ्यांचा पांढरा भाग हा जास्त प्रमाणात दिसतो तसेच बुबुळही जवळपास संपूर्ण दिसते.
मेक-अप : डोळ्यांचा आकार गोल असल्यामुळे डोळे लांबट दिसतील असा मेक-अप करावा. मध्यम रंगाचे आय शॅडो पापणीला लावा. तसेच डोळ्यांच्या वरच्या आणि खालच्या बाहेरील कडांना लावावे. गडद आयलायनर लावताना डोळ्यांच्या बाहेरील बाजूला वाढवत जावे, जेणेकरून डोळ्यांची लांबी जास्त भासेल.

ऊध्र्वगामी डोळे (Upturn Eyes)
डोळ्यांची नैसर्गिक ठेवणच ऊध्र्वगामी पद्धतीची असते. म्हणजेच बाहेरील कडा वरच्या दिशेला असतात. पापणीचा बराचसा भाग दिसतो.
मेक-अप : डोळ्यांच्या बाहेरील कडांचे सौंदर्य खुलवावे. तसेच डोळे समांतर दिसतील असा प्रयत्न करावा. अपटर्न आइजसाठी स्मोकी इफेक्ट अतिशय योग्य आहे. फिकट आय शॅडोचा वापर करावा, भुवईच्या हाडाला मॅट तर पापणीवर शिमर लावावे. आयलाइनरची जाडी बारीक असू द्यावी. तसेच गडद आय शॅडो बाहेरील कडांवर (वरच्या व खालच्या) लावावे. त्यामुळे डोळे समांतर दिसतील.

खाली झुकलेले डोळे : (Downturn Eyes)
कुठल्याही आयलाइनरच्या लूकसाठी योग्य असा हा आकार आहे. डोळ्यांचा आकार थोडा खालच्या बाजूने झुकलेला असतो.
मेक-अप : मेक-अप करत असताना डोळ्यांच्या आकाराला जास्त महत्त्व द्या. त्याबरोबरच डोळ्यांच्या कडादेखील उठावदार दिसतील याकडे लक्ष द्या. फिकट रंगाच्या आय श्ॉडोचा वापर करावा. डाउनटर्न आइजसाठी ‘कॅट आय लूक’ योग्य आहे. त्यासाठी डार्क आय श्ॉडो किंवा आयलाइनर वापरू शकता. सर्वात महत्त्वाचे खालच्या पापणीला काहीही लावू नका.

मोनोलिड आइज (Monolid Eyes )
डोळ्यांची क्रीज लाइन कमी असते किंवा जवळपास नसते, तसेच भुवईचे हाडही दिसत नाही. पापणी मोठी असल्याने मेक-अपचे विविध लूक्स आणू शकता.
मेक-अप :
डोळे प्रमाणबद्ध दिसण्याकरिता फिकट आय शॅडो भुवईच्या खाली लावावा. मीडियम शेडने पापणी हायलाइट करावी. गडद मॅट शेडने किंवा आयलाइनरने वरच्या आणि खालच्या पापणीला आउटलाइन द्यावी.

हुडेड आईज (Hooded Eyes)
सर्वसामान्य डोळ्यांपेक्षा हुडेड आइजमध्ये पापणीचा भाग कमी असतो.
मेक-अप : डोळ्यांचा आणि पापणीचा आकारच लहान असल्यामुळे मेक-अपला मर्यादा येते. म्हणूनच मेक-अप करताना डोळे मोठे दिसतील याची काळजी घ्या. त्यासाठी आयलाइनरची जाडी बारीकच असायला हवी.