पदार्थ कसा करावा, याचं ज्ञान हल्ली इंटरनेट देतं. फूड रेसिपीजसाठी ऑनलाइन सर्च करणाऱ्यांची संख्या भारतात सगळ्यात जास्त आहे. कुठल्या पाककृती इंटरनेटवर हिट आहेत, कुठल्या शेफच्या रेसिपी सर्वाधिक बघितल्या जातात, याचं रेटकार्ड.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंटरनेटचा वापर हल्ली बऱ्याच वेळा व्हिडीओ बघण्यासाठी होतो. यूटय़ूब हा त्यासाठीचा तरुणाईचा आवडता प्लॅटफॉर्म आहे. यूटय़ूबवर मनोरंजनाचे कार्यक्रम बघितले जातात त्या खालोखाल पाककृतींचे व्हिडीओ बघितले जातात, असं उघड झालं आहे. ‘यूटय़ूब’ने ऑगस्टमध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, रेसिपीसाठी यूटय़ूब सर्च करणाऱ्यांच्या संख्येत भारत आघाडीवर आहे. यूटय़ूबवरच्या टॉप टेन फूड चॅनेलवरमधली चार एशियन फूड रेसिपीजची आहे. भारतीय पाककृती जगात प्रसिद्ध आहेतच आणि त्या कराव्या कशा हे शोधण्यासाठीही जगभरातून विचारणा होतेय, हेच यातून दिसून येतं.
यू टय़ूब एशिया पॅसिफिकचे संचालक (कण्टेण्ट अ‍ॅण्ड ऑपरेशन्स) गौतम आनंद या संदर्भात माहिती देताना म्हणाले, ‘यूटय़ूबवर फूड आणि कुकिंगविषयीचे व्हिडीओच नेहमीच चलतीत असतात. जगभरात इंटरनेट व्हिडीओ सर्चमध्ये फूडरेसिपी सर्चला पहिल्या दहांत स्थान आहे. भारतात तर हे स्थान पहिल्या पाचांत आहे. पाककृतींसाठी यूटय़ूब बघणाऱ्यांची संख्या भारतात उत्तरोत्तर वाढते आहे. दरवर्षी आम्हाला यात ४० टक्के वाढ होताना दिसतेय.’
नेमक्या कुठल्या रेसिपीजसाठी भारतीय लोक यूटय़ूबवर धडक मारतात, कुठल्या शेफच्या कुठल्या पाककृती हिट आहेत, याची आकडेवारी यूटय़ूबनं जाहीर केली होती. त्यानुसार चिकनकरीची पाककृती सर्वात जास्त पाहिली गेली. स्नॅक्स रेसिपीजमध्ये पहिला नंबर लावलाय ढोकळ्यानं आणि त्याखालोखाल सामोसा कसा करायचा हे शोधलं जातंय. आश्चर्य म्हणजे पोहे कसे करायचे हे बघण्यासाठीही लोक यूटय़ूबवरचे व्हिडीओ बघतात. ‘पोहा रेसिपी’ हा सर्च तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

प्रसिद्ध शेफ आणि गृहिणीदेखील हिट
यूटय़ूबवर कुणीही व्हिडीओ पोस्ट करू शकतो. कारण ती सोशल साइट आहे. यूटय़ूबवर नामवंत शेफची फूड चॅनेल्स आहेत तशी सामान्य गृहिणींनीही आपलं पाककौशल्य इतरांपर्यंत पोचवण्यासाठी यूटय़ूबची मदत घेतली आहे. २०१३ आणि २०१४ मध्ये व्ह्य़ूज आणि वॉचटाइमच्या आकडेवारीनुसार प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यूटय़ूबवर सर्वात हिट ठरले. गंमत म्हणजे त्यांच्या जोडीला सामान्य गृहिणींनी टाकलेल्या रेसिपी व्हिडीओजनाही तितकीच लोकप्रियता लाभल्याचं दिसतं. निशा मधुलिका या नॉयडाला राहणाऱ्या गृहिणी आणि गायत्री शर्मा या ४० वर्षांच्या मुंबईच्या गृहिणीच्या पाककृतींना यूटय़ूबवर सर्वाधिक हिट्स मिळाल्या.

सर्वात जास्त सर्च झालेल्या यूटय़ूब रेसीपीज
चिकनकरी
बिर्याणी
पनीरकरी
केक
पिझ्झा

टॉप सर्च्ड
डेझर्ट रेसिपीज
केक
हलवा
रसगुल्ला
गुलाबजाम
आइसक्रीम

भारतातले २०१३-१४ मधले टॉप ५ कुकिंग व्हिडीओ
* चिकन बिर्याणी रेस्टॉरंट स्टाइल – शेफ संजय थुम्मा (वाहरेवाह.कॉम)
* फ्रेंच फ्राइज रेस्टॉरंट स्टाइल – संजीव कपूर
* हैदराबादी चिकन बिर्याणी – सेफ हरपाल
* हाऊ टू मेक पिझ्झा ऑन तवा – निशा मधुलिका
* कॉपीकॅट केएफसी फ्राइड चिकन – होममेड

जगभरात २०१३- १४ मध्ये सर्वाधिक शोधले गेलेले कुकिंग व्हिडिओ
* How to make frozen princess cake
* Rainbow cake
* Summer treats : Halthy homemade Popsicles Birthday cake ideas
* How to make pricess doll birthday cake
* Frozen Cake pops- All the Disney Frozen characters as cake.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use of internet and you tube for searching food recipes
First published on: 21-11-2014 at 03:06 IST