रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय.

 

ग्रीन ग्रेव्ही
साहित्य : सर्वप्रथम पालक निवडून धुऊन घ्या. त्याच्या दुप्पट पाणी उकळत ठेवून त्यामध्ये पाव चमचा सोडा घाला. उकळत्या पाण्यात पालक टाकून फारतर अर्धा मिनिट ठेवा व रंग बदलल्यावर लगेच बाहेर काढून पसरून ठेवा; जेणेकरून तो थंड होईल. कारण पालक जेवढा जास्त वेळ गरम राहील तेवढा त्याचा रंग नाश होईल. म्हणजेच तो मेहंदी रंगाचा होईल. लगेच मिक्सरवर बारीक करून झाकूण ठेवा. उघडा ठेवल्यास त्याचा स्वाद कडवट होईल.
साहित्य : आलं-लसूण पेस्ट १ वाटी, तेल- १/२ वाटी, हिरव्या मिरचीचे वाटण- चवीप्रमाणे, मीठ- चवीप्रमाणे, कसुरीमेथी- २ चमचे, तेजपान २-३, खडा मसाला- १ चमचा
कृती : पातेल्यात तेल घेऊन, गरम झाल्यावर आलं-लसूण पेस्ट घाला. नंतर त्यात कसुरी मेथी, तेजपान, खडा मसाला घालून सर्वात शेवटी पालकाचे वाटण घालावे, मीठ चवीप्रमाणे घालून थोडा वेळ परतावे. थंड केल्यावर फ्रीजमध्ये ठेवावे.
टीप : १) पालक उकळताना प्रथम पाणी उकळून घ्यावे, त्यात पाव चमचा खाण्याचा सोडा घालून मगच पालक त्यात घालावा. जास्त प्रमाणात पालक असेल तर थोडा थोडा करत उकळावा. गरम पाण्यात पालक जास्त वेळ राहिल्यास त्याचा हिरवा रंग काळपट होतो.
२) तयार केलेली पालक पेस्ट जास्त वेळ हवेच्या संपर्कात असली तर ती कडवट होते. त्यामुळे पेस्ट झाल्यावर लगेच झाकून ठेवावी किंवा हवाबंद डब्यात ठेवावी.

पीज् टोफू इन ग्रीन ग्रेव्ही
साहित्य : बेसिक ग्रीन (पालक) ग्रेव्ही- २ वाटय़ा, हिरवे मटर- १ वाटी, टोफू चौकोनी कापलेला टोफू- १ वाटी,
(म्हणजे सोयाबीनच्या दुधाचे पनीर टोफू नसल्यास)
बारीक कापलेला लसूण- २ चमचे, लिंबाचा रस- १ चमचा, साखर मीठ- चवीनुसार, फ्रेश क्रीम- २ चमचे, किसमिस- २ चमचे,  काजू- २ चमचे, तेल- १ चमचा
कृती : फ्राय पॅनमध्ये थाडेसे तेल घेऊन लसूण घालावा. त्यानंतर हिरवे मटर व टोफू (किंवा पनीर) घालून परता. नंतर यात किसमिस, िलबाचा रस, चवीनुसार मीठ व पालकाची ग्रेव्ही घालून लगेच गरम पराठय़ाबरोबर खायला द्या.

गोष्त पलकाई
साहित्य : ताजे मटण- १ किलो, आंबट दही- २ वाटय़ा, आलं-लसूण पेस्ट – अर्धा वाटी, कोिथबीर, हिरव्या मिरचीचे वाटण- १ वाटी, खडा मसाला- अर्धा चमचा, बारीक कापलेला कांदा- १ वाटी, बारीक कापलेला लसूण- ५ चमचे, तेल- अर्धी वाटी, फ्रेश क्रीम- अर्धा वाटी, कसुरी मेथी- २ चमचे, बेसिक ग्रीन ग्रेव्ही- ३ वाटय़ा
कृती : स्वच्छ धुतलेल्या मटणात दही, आलं-लसणूची व हिरव्या मिरच्यांची पेस्ट, कसुरी मेथी मिसळून चवीनुसार मीठ घालावे. दीड ते दोन तास ठेवून नंतर त्याला त्याच्याच पाण्यात षिजवावे (ब्रेझिंग करावे). असे शिजवलेले मटण बाजूला ठेवावे. फ्राय पॅन किंवा पातेल्यात दोन चमचे तेल घेऊन प्रथम जिरे व नंतर कांदा-लसूण घालून परतावे. शिजवलेले मटण घालून पुन्हा १-२ मिनिटे हाय फ्लेमवर परतावे. नंतर आवश्यकतेनुसार त्यात बेसिक ग्रीन ग्रेव्ही, फ्रेश क्रीम व कोिथबीर घालून गरम गरम वाढावे.
टीप : १) प्रथम मटण शिजवून ठेवावे व वेळेवर पालकाच्या ग्रेव्ही बरोबर फ्लॉम्बिंग करून ही भाजी द्यावी.
२) भाजी केल्यावर तरी थोडय़ा वेळाने वाढली तर लगेच रंगात फरक पडतो.

फ्रेंच बीन्स विथ ग्रीन पालक
साहित्य : पालकाची मोठी पाने- ८-१०, कोथिंबीर, बारीक चिरलेले लसूण- १चमचा, फरसबी ८-१०, लिंबाचा रस- एक लिंबू, मीठ, साखर चवीनुसार, जाडसर कुटलेली काळी मिरी- पाव चमचा, अजिनोमोटो- छोटा अर्धा चमचा, तेल- १ चमचा, कॉर्नस्टार्च- २ चमचे
कृती : प्रथम पाणी पातेल्यात घेवून गरम करावे उकळल्यानंतर थोडेसे मीठ व नंतर फरसबीच्या शेंगा शिजवून घ्या. त्या लगेचच बाहेर काढून थंड पाण्यात घालावे. यामुळे त्याचा हिरवा रंग टिकेल. दुसऱ्या एका भांडयात एक चमचा तेल घालून गरम झाल्यावर लसूण घालून दोन वाटया पाणी घालावे. पाणी उकळल्यावर मीठ,साखर, लिंबू व काळी मिरी घालून कॉर्नस्टार्चच्या द्रावणाने त्याला घट्ट करावे. या घट्ट झालेल्या मिश्रणात पालकाची अख्खी पाने व फरसबीच्या शेंगा घालाव्यात. पदार्थ वाढतांना दोन फरसबीच्या शेंगा बरोबर एखादे पालकाचे पान व ग्रेव्ही असे वाढावे.
टीप :- १) ही भाजी वेळेवर करुनच खावी. त्यामुळे याचा हिरवा रंग कायम राहील.

खडा पालक पनीर
हा पालक पनीरचा थोडा वेगळा प्रकार. यात आपण पालकाची ग्रेव्ही वापरणार नाही तर यात बारीक चिरलेला पालक वापरणार आहोत. चवीला थोडा वेगळा व पटकन होणारा प्रकार आहे.
साहित्य : बारीक चिरलेला लसूण- १ चमचा, बारीक लांब चिरलेला पालक- २०० ग्रॅम, जिरे- अर्धा चमचा, लांब चिरलेला कांदा- १ वाटी, पनीर चौकोनी- एक वाटी, टोमॅटो मोठया तुकडयांमध्ये- १ वाटी, मीठ, साखर- चवीनुसार, हिरवी मिरची चरलेली – आवश्यकतेनुसार, िलबाचा रस- एक चमचा, तेल – दोन चमचे
कृती : फ्राय पॅनमध्ये प्रथम तेल घेऊन जिरे तडतडल्यावर हिरवी मिरची, लसूण, कांदा घालून नंतर पनीर घालावे. तांबूस परतावे. सर्वात शेवटी लांब चिरलेला पालक व मीठ चवीप्रमाणे घालून सव्‍‌र्ह करावे. बनवायला अतिशय सोपा असा हा प्रकार आहे.
टीप : १) पालकाची पाने बारीक व लांब कापण्याकरता प्रथम पालकाची पाने तोडून धुऊन एकावर एक रचून ठेवा. नंतर याची गुंडाळी करून गुंडाळीच्या एका बाजूने स्लाइसेस कापतो, तशा कापा.