वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले नूर महंमद पठाण यांची लातूर येथे ५० लाख रुपयांची मालमत्ता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने उघड केली आहे. लातूर जिल्हय़ात त्यांची किती मालमत्ता आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.
वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नूर महंमद पठाण यांच्यावर नांदेड येथील भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या मालमत्तेचा लातूर येथे शोध घेणे सुरू आहे. नूर महंमद पठाण यांची पत्नी शहनाज पठाण यांच्या नावे पडीले कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे श्यामनगर येथे उच्चभ्रू वस्तीत तीन मजली भव्य व आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत ५० लाख रुपये आहे. लातूर जिल्हय़ात त्यांची आणखीन किती मालमत्ता आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. याकामी लाचलुचपत प्रतिबंधक नांदेड विभागाचे पोलीस अधीक्षक यु. व्ही. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एन. जी. अंकुशकर, पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके, अशोक गायकवाड, विलास मरवाळे, व्यंकट पडीले, मुक्तार शेख, गोिवद जाधव, बालाजी जाधव, आदी या मोहिमेत सहभागी आहेत.