विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे लवकरच वाटप करण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी सांगितले.
यावर्षी विदर्भातील शेतक ऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. अतिवृष्टीने पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले, जमीन खरडून गेली. जीवित व मालमत्तेची हानी झाली. याची दखल घेऊन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी विदर्भात दोनदा केंद्राचे पथक पाठविले आणि नुकसानीचा आढावा घेतला. पवारांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी, यासाठी पॅकेजच्या निकषांमध्ये बदल करवून घेतले. पवारांच्या पुढाकारामुळे विदर्भातील शेतक ऱ्यांना ९२१ कोटी रुपयांचे पॅकेज केंद्राकडून मिळाले आहे. केंद्रीय पथकाने नागपूर जिल्ह्य़ातील १३ तालुक्यांची पाहणी केली. नुकसानीचा पहिला हप्ता म्हणून राज्य सरकारतर्फे ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या मदतीचे वाटप विदर्भात लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे देशमुख म्हणाले.
नागपूर –   १३, ७९९
कामठी –   १३,६९९
हिंगणा –    २१,६४८
सावनेर –   २६,६४१
काटोल –   ३३,३५३
नरखेड –   ४०,९५५
कळमेश्वर -१५,६२६
उमरेड-    २७,९९०
भिवापूर –  १९,७८८
कुही       २३,०६३
रामटेक –   ८,९८९
पारशिवनी -१०,५१४
मौदा –    १२,९२५