18 September 2020

News Flash

विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात

देशाचा ६७ वा स्वातंत्र्यदिन शहरात विविध शाळा, महाविद्यालय, संस्थांनी मोठय़ा उत्साहात साजरा केला.

| August 17, 2013 01:57 am

देशाचा ६७ वा स्वातंत्र्यदिन शहरात विविध शाळा, महाविद्यालय, संस्थांनी मोठय़ा उत्साहात साजरा केला.
सिडको, वाळूज येथील ज्ञानेश्वरी क्रीडा मंडळाच्या वतीने ‘एक ज्योत अखंड भारतासाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ज्योत प्रज्वलित करण्यात आली. ही ज्योत १५ ऑगस्टला ध्वज उतरवला जाईपर्यंत २४ तास प्रज्वलित ठेवली होती. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वाघ, माजी सैनिक नानासाहेब हरकल, सामाजिक कार्यकर्ते मदन पवार आदी उपस्थित होते.
गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये पत्रकार संजय वरकड यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला. एमआयटी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यज्ञवीर कवडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना या वेळी गणवेश वाटप करण्यात आले. आझाद अली शाह शिक्षण संस्थेद्वारे संचालित पडेगाव येथील एमजीएम वस्तानवी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्य सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव शेख आसीफ यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. खडकेश्वर येथील शायनिंग स्टार इंग्रजी व मराठी प्राथमिक शाळेत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे संचालक जितेंद्र गोरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. नंदकिशोर राऊत, सुरैया खान आदी उपस्थित होते.
बीडमध्ये स्वातंत्र्यदिन आंदोलनांनी दणाणला!
वार्ताहर, बीड  
स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजवंदन होत असताना शहरात वळणरस्त्यासाठी महायुतीचे रास्ता रोको, तर विविध सरकारी अनुदान योजनेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला. इतरही दोन ठिकाणी विविध मागण्यांसाठी उपोषण व आंदोलन झाले. साहजिकच स्वातंत्र्यदिन आंदोलनांनीच दणाणला.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाचा शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी ९ वाजता पालकमंत्री क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देताना जिल्हय़ातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपये आल्याचे क्षीरसागर यांनी या वेळी सांगितले. याच वेळी बाहेर जिल्हाधिकारी कार्यालयाला आंदोलकांच्या इशाऱ्यामुळे छावणीचे स्वरूप आले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रावण बाळ योजनेच्या दाखल अर्जाची पुनर्तपासणी करावी, या व इतर मागण्यांसाठी अर्धनग्न मोर्चा काढला. यात दिलीप भोसले, अशोक िहगे, रवी वाघमारे यांच्यासह कार्यकत्रे मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेसमोरही विविध मागण्यांसाठी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. औरंगाबाद रस्त्यावर महायुतीने वळणरस्ता व्हावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. भाजपचे रमेश पोकळे, शिवसेनेचे अनिल जगताप, रिपाइंचे प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे, सर्जेराव तांदळे या पदाधिकाऱ्यांसह मोठय़ा संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीची कोंडी झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2013 1:57 am

Web Title: independence day in ardour to various activity
Next Stories
1 उत्तराखंडात बेपत्ता भाविकांच्या वारसांना सर्व ते सहकार्य- धस
2 संघर्ष सर्वपक्षीय समितीची विविध मागण्यांसाठी रॅली
3 मनसेचे सातारा भागात खड्डे बुजवा अभियान!
Just Now!
X