शहरातील अग्रगण्य सामाजिक संस्था मैत्री परिवारतर्फे अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर नागपूर पोलीस दलाला एक रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. पोलीस दलातील कर्मचारी रात्रंदिवस सेवारत असतात. अनेकदा त्यांना त्वरित वैद्यकीय मदतीची गरज असते. शहाराचा वाढता व्याप लक्षात घेऊन रुग्णवाहिकेची आवश्यकता मैत्री परिवाराच्या लक्षात आली व संस्थेतर्फे रुग्णवाहिका प्रदान करण्याचा समारंभ पोलीस मुख्यालयात पार पडला. पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. रुग्णवाहिकेच्या चाव्या मैत्रीचे कोषाध्यक्ष अनुप सगदेव यांनी आयुक्तांच्या स्वाधीन केल्या. याप्रसंगी सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, अनंत शिंदे, रमेश जाधव, पी.पी. धरमशी, अनिल देशमुख, राजेश लबडे, नाना समर्थ, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एस. मडके, मुकुंद श्रावणकर, संजय भेंडे, प्रमोद पेंडके, अनुप सगदेव, डॉ. पिनाक दंदे, अरविंदा गिरी, विष्णु मनोहर, संजय नखाते, सुनील शिर्सीकर, जगदीश गणभोज, कुमार जोशी, रवी फडणवीस, आशीष मेरखेड, विजय भुसारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. भुमकर, उमेश रोटगे आदी उपस्थित होते.