माझ मनमाड, सुंदर मनमाड ही संकल्पना साकार करण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. शहरातील सर्व नागरिक, पक्ष, सामजिक, सांस्कृतिक संघटना यांनी या उपक्रमात भरीव योगदान द्यावे. जनतेने सुचवलेल्या स्वच्छतेबाबतच्या विविध सूचनंचा प्राधान्याने विचार करू व स्वच्छतेसाठी व्यापक जनजागृती आणि प्रबोधन करण्याचा मनोदय मनमाडचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी व्यक्त केला.
नगराध्यक्ष पाटील यांच्या पुढाकाराने छत्रे विद्यालयाच्या सीता लक्ष्मी सभागृहात ‘माझ मनमाड, सुंदर मनमाड ’ या उपक्रमाचा आराखडा तयार करण्यासाठी आणि विचारांचे आदान-प्रदान करण्याच्या हेतूने शहरातील नागरिक विविध पक्ष कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यातोले होते. यावेळी नगराध्यक्षांनी उपरोक्त प्रतिपादन केले.
मनमाड शहरातही इतर शहरांसारख्या सुखसुविधा, स्वचछता, आरोग्य असे वातावरण असावे, असे विचार सर्वाच्या मनात आहे. पण शहरातील कचऱ्याचा विषय ऐरणीवर आला आहे. कचऱ्यामुळे आरोग्याच्या समस्या उग्र स्वरुप धारण करत आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्या योग्य समन्वयातून आणि क्रियाशील सहभागातून शहरातील स्वच्छता कायम स्वरुपी राखता येऊ शकते. याबाबत ज्येष्ठ नागरिक डॉ. आर. एल. पहाडे, प्रमोद मुळे, सचिन निभोंरकर, रमेश वावधने, विकास काकडे, रमाकांत मंत्री आदींनी विविध सूचना मांडल्या. त्यात शहरातील कचऱ्याची समस्या, तुंबलेल्या गटारी, कचरा कुंडय़ा, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, व्यापक जनजागृती आणि जनप्रबोधन यावर चर्चा झाली. घरातला कचरा व त्याची विल्हेवाट कशी लावता येईल, स्वच्छता मोहिमेत सर्वाचा सहभाग, रविवारी आठवडे बाजार संपल्यानंतर तातडीने या भागात स्वच्छता करावी, सायंकाळीच कचरा उचलावा, घंटागाडय़ांची संख्या वाढवावी, व्यापारी पेठेत सकाळी १० नंतर कचरा गाडी फिरवावी तसेच गटरीवरील अतिक्रमणे तातीडने काढावी, नवीन जलवाहिनी कामाच्या वेळी खोदकामामुळे अनेक गटारी बंद झाल्या आहेत. तसेच अनेक गटारीच्या सांडपाण्याचे प्रवाह थांबले आहेत. त्याची तातडीने दुरूस्ती करावी, रस्त्यांवरील बांधकामाचे साहित्य हटवावे आणि प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी घालावी, आदी विविध उपाययोजना आणि सूचना या बैठकीत करण्यात आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. स्वच्छतेबाबत शालेय स्तरावर व इतर विविध माध्यमातून व्यापक जनप्रबोधन करावे, पालिका प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी, अशी ही अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. स्वच्छतेबाबत जागरुकता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे माझ मनमाड सुंदर मनमाड या कामी पालिका प्रशासनाबरोबर समाजानेही योगदान द्यावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी केल.े या विविध उपक्रमात पालिका प्रशासन कडक भूमिका स्वीकारणार आहे. असेही मेनकर यांनी सांगितले.