हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे, तर नागपूर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे याबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे हिंगोलीत शिवसेनेचा मुकाबला काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस करणार, याविषयी दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.
दोन्ही काँग्रेसच्या वाटपात हिंगोलीची जागा आतापर्यंत राष्ट्रवादीच्या वाटय़ाला होती. शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी माजी केंद्रीयमंत्री सूर्यकांता पाटील यांचा पराभव केला आणि या मतदारसंघात विजयाची परंपरा राखली. या मतदारसंघात पूर्वी झालेल्या निवडणुकीत एक वेळ काँग्रेस, तर दुसऱ्यांदा विरोधी पक्षाचा खासदार निवडून येतो, असे अघोषित सूत्र राहात आले आहे. त्यामुळे आता होणाऱ्या निवडणुकीत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार राजीव सातव यांच्यासाठी हा मतदारसंघ काँग्रेस घेणार व त्या बदल्यात दुसरा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडणार, अशी चर्चा गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात होत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या वतीने िहगोली ते मुंबई अनेक बठका झाल्या. या बठकांमध्ये हिंगोलीची जागा राष्ट्रवादीनेच लढविण्याची मागणी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे केली.
राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनीही िहगोलीतून राष्ट्रवादीच निवडणूक लढविणार असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिल्याने, पक्षाचे कार्यकत्रे तसेच माजी मंत्री पाटील आपली उमेदवारी निश्चित असल्याचे मानून कामाला लागले, तर सर्वोच्च न्यायालयातील अॅड. शिवाजीराव जाधव, माजी खासदार डी. बी. पाटील, अॅड. शिवाजी माने यांनीही उमेदवारीसाठी आपापल्या परीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या पाश्र्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी नागपूरची जागा राष्ट्रवादीकडे, तर िहगोलीची काँग्रेसला देण्याचा पहिला निर्णय झाल्याची वार्ता िहगोलीत पसरली आणि दोन्ही काँग्रेस िहगोलीच्या जागेवर दावा करीत असताना नागपूरच्या कथित निर्णयाने दोन्ही काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचा मुकाबला कोणती काँग्रेस करणार, यावर जोरदार चर्चा चालू आहे.
दरम्यान, िहगोलीतून काँग्रेसचे आमदार सातव यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. त्या बदल्यात नागपूरची जागा राष्ट्रवादीला सोडली जाणार आहे. नागपूरहून अनिल देशमुख यांनी निवडणूक लढवावी, यावर राष्ट्रवादीत गांभीर्याने विचार चालू असल्याचे समजते.