मतदान यंत्रात झालेले बिघाड, निवडणूक आयोगाच्या कडक निर्देशानंतरही केंद्रांवर झालेले नियमांचे उल्लंघन, सुरक्षा व्यवस्था व इतर सोयींचा अभाव असे काही अपवाद वगळता शहरात मतदान शांततेत पार पडले. मतदानासाठी महिला व नव मतदारांमध्ये अमाप उत्साह  दिसून आला. अनेक केंद्रांवर मतदारांच्या मोठय़ा रांगा पाहायला मिळाल्या.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरातील विविध भागात नागरिकांमध्ये केलेल्या जागृती मोहिमेचा चांगला परिणाम झाला. सकाळी सात वाजता नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले. बहुतेक मतदान केंद्रांवर सकाळी पहिल्या दोन तासात मतदानाचा वेग संथ होता. पश्चिम नागपुरातील वनामतीजवळील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंदावर सकाळी ९ वाजेपर्यंत १० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शंकरनगर चौकातील सरस्वती विद्यालयातील तीन मतदान केंद्रावर सकाळी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये वयोवृद्ध नागरिक, महिला व युवतींचा मोठय़ा प्रमाणात सहभाग होता. या केंद्रांवर सकाळी ९ वाजेपर्यंत ८ टक्के मतदान झाले. रामनगर चौकातील रामनगर भारत विद्यालयातील दहा मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. या केंद्रावर वयोवृद्ध चंद्रभान दिग्रसे यांनी लोकसभेसाठी आठव्यांदा मतदानाचा हक्क बजावला. सुधाकर मंगळमूर्ती व शैलजा मंगळमूर्ती यांची नावे मतदार यादीत नसल्याने त्यांनी रोष व्यक्त केला. या केंद्राला सकाळी १० वाजता निवडणूक निरीक्षक शशीभूषण तिवारी यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या ठिकाणी काहीही गडबड नाही. शांततेत मतदान सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
गांधीनगरातील महाराष्ट्र अध्ययन मंदिरातील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. या ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने नवीन यंत्रे लावण्यात आली. यामुळे २५ मिनिटे मतदान थांबले होते. पश्चिम नागपुरातील एका टोकाला असलेल्या जयताळातील जकाते ऑडोटोरियममधील मतदान केंद्रांवर एका यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान थांबले. मनीषनगरातील ओएस्टार इंग्लिश स्कूलमधील चार मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या. या केंद्रावर ८५ वर्षीय शोभा वसंत पांडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. बाभुळखेडय़ातील मानवता हायस्कूमधील ९ मतदान केंद्रांवर सकाळी ११ वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले. हनुमान नगरातील लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदार यादीत काही मतदारांच्या नावावर रेड क्रॉस मारलेला असल्याने त्यांना मतदान करता आले नाही. जवळपास ६३ मतदारांना परत जावे लागले. या केंद्रावर सुरक्षा व्यवस्था आढळली नाही. शाळेच्या परिसरात चार चाकी व दुचाकी वाहने उभी केलेली होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन होताना ठिकठिकाणी दिसून आले. मतदान केंद्राबाहेरील राजकीय पक्षांचे बुथ हायटेक होते. या केंद्रावर प्रमिला बळवंत ढोकणे व निर्मला पुरुषोत्तम गभणे यांच्यासह अनेक वयोवृद्धांनी मतदान केले.
मोमीनपुऱ्यात शांततेत मतदान
शहराच्या संवेदनशील मोमीनपुरा भागात शांततेत मतदान झाले. या भागातदील हज अब्दुल मजीद लीडर ऊर्दू हायस्कूलमधील मतदार केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या केंद्रांवर दुपारी दोन वाजेपर्यंत ४४ टक्के मतदान झाले.

मान्यवरांचे मतदान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी महाल भागातील संघ कार्यालयाच्या शेजारी असलेल्या भाऊजी दफ्तरी शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन आज सकाळी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर ७.३० च्या सुमारास सरसंघचालक डॉ. भागवत आणि भैय्याजी जोशी मतदान केंद्रावर पोहोचले. मतदान केंद्रावर आधीच रांग लागली असल्याने दोघेही प्रवेशद्वाराजवळ रांगेत लागले होते. दरम्यान, परिसरातील काही नागरिकही या मतदान केंद्रावर पोहोचले व सरसंघाचालकांच्या मागे रांगेत लागले. सरसंघचालक मतदान करणार म्हणून प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व छायाचित्रकार केंद्राच्या बाहेर उभे होते. शिवाय सरसंघचालकांच्या सुरक्षेत असलेले सशस्त्र अधिकारी व जवानही परिसरात उभे होते. बरोबर साडेसात वाजता सरसंघचालकांना आत प्रवेश मिळाला व त्यांनी मतदान केले. त्यानंतर भैय्याजी जोशी यांनी मतदान केले. याशिवाय संघ कार्यालयातील प्रचारकांनी देखील या केंद्रावर मतदान केले. मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, ‘लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. किंबहुना प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. मी देखील एक नागरिक म्हणून मी मतदान केले आहे. देशात परिवर्तन होऊ शकते का असे विचारले असता डॉ. भागवत म्हणाले, याबाबत १६ मे रोजी बोलता येईल. मोदी पंतप्रधान होतील की नाही याबाबत निर्णय देशातील जनता घेईल.
भैय्याजी जोशी म्हणाले, देशातील एक नागरिक म्हणून मतदान केले आहे. शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडले पाहिजे. देशळात परिवर्तन व्हावे ही देशातील जनतेची इच्छा आणि अपेक्षा असेल तर परिवर्तन होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी भाजपचा प्रचार केला नाही. भाजपाच्या नेत्यांच्या वादामध्ये संघ कधी पडत नाही. निवडणुकीमध्ये राजकीय नेत्यांचा भाषणाचा स्तर घसरला आहे हे खरे असून लोकशाहीला घातक आहे. जाती धर्मावरून भाषणे देणे म्हणजे हिंदू मुस्लिम समाजा विभाजन करण्यासारखे आहे. हा सर्व प्रकार निवडणुकीमध्ये टाळायला हवा अशी अपेक्षा जोशी यांनी व्यक्त केली.

Innovative Polling Stations, Nagpur, Environment and Tribal Culture, nagpur lok sabha seat, polling station, slefie points, gadchiroli, nagpur polling station news,
मतदान केंद्रांवर जंगल, पर्यावरण, आदिवासी संस्कृतीचे दर्शन……
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Foreign investors invested more than Rs 2 lakh crore in the domestic capital market
परदेशी गुंतवणूकदारांचे दमदार पुनरागमन; सरलेल्या आर्थिक वर्षात २ लाख कोटींची गुंतवणूक
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

५१ व्या वर्षी पहिले मतदान
धरमपेठेतील निवासी जयश्री सोहनी यांनी वयाच्या ५१व्या वर्षी पहिल्यांदा मतदान केले. त्यांच्या एक सहकारी त्यांना मतदान केंद्रावर घेऊन आल्या होत्या. याविषयी त्यांना विचारले असता आईवडिलांनी कधी मतदान यादीत नावच टाकले नाही. त्यानंतर पण कधी कुणी प्रयत्न केला नाही. यावर्षी  निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान यादीत नाव नोंदवले आणि कार्ड मिळाले. मतदान कसे करायचे, याविषयी काहीच माहिती नाही. त्यामुळे वयाच्या ५१व्या वर्षी पहिल्यांदा मतदान करताना आनंद, उत्सुकता, हुरहूर आहे, असे त्या म्हणाल्या.

तरुणाईचा उत्साह
पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणाईचा उत्साह पाहण्यासारखा होता. सकाळपासूनच ज्येष्ठांसोबत तरुणाईसुद्धा मतदान प्रक्रियेत सहभागी झाली होती. यावेळी त्यांच्यात ‘एक्साईटमेंट’ बघायला मिळाली. पक्ष आणि व्यक्ती महत्त्वाच्या नसून पक्षाचे आणि त्या व्यक्तीचे काम महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणाचा फारसा अनुभव नाही, पण जे काही देशात सध्या सुरू आहे त्यावरुनच मतदान करणार असल्याचे तरुणाईने सांगितले.

मतदारांच्या सेवेसाठी..
निवडणूक म्हटल्यानंतर मतदारांच्या सेवेसाठी उमेदवारांपासून तर उमेदवारांचे कार्यकर्तेही हजर असतात. प्रत्येकच निवडणुकीत येणारा हा अनुभव या निवडणुकीतसुद्धा आला. मतदारांना त्यांचे मतदान कुठे असले पाहिजे यासाठी ठिकठिकाणी बुथ उभारण्यात आले आहेत. त्या प्रत्येक बुथवर मतदारांना त्यांचे यादीतील नाव शोधून देण्याबरोबरच, त्याचे नाव इतर मतदान केंद्रावर असेल तर त्याला ऑटोने पोहोचवून देण्याचीही व्यवस्था अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. विशेष करुन धरमपेठ मार्गावरील सेंट्रल मॉलसमोर उभारलेल्या बुथवर एकीकडे मतदारांची तर दुसरीकडे मतदारांना पोहचवून देणाऱ्या ऑटोंची रांग लागलेली होती.

देशात मोदींची लाट
देशात मोदींच्याच नावाची लाट आहे आणि नागपुरात नितीन गडकरी यांची चर्चा आहे. एखाद्याच्या नावाची लाट आली की तीच कायम राहते, असा देशाचा राजकीय इतिहास सांगतो. त्यामुळे भाजप-शिवसेना ही महायुतीच जिंकेल, यात शंका नाही. जनता मोदींना पंतप्रधान पदावर आरुढ झालेले पाहात आहे. जनता परिवर्तनाकरिता मतदान करते आणि निकालाच्या दिवशी सर्वानाच हे कळून येईल. नागपुरातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असून, विशेषत: तरुण मतदारांमध्ये मतदानाविषयीचा उत्साह अधिक आहे. हीच तरुणाई नागपुरात गडकरींना निवडून आणेल, कारण नागपुरात गडकरींशिवाय कुणाच्याही नावाची चर्चा नाही असे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि नागपूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नितीन गडकरी, पत्नी कांचन गडकरी, मुलगा निखिल आणि सारंग आणि सुना यांनी महालातील महापालिकेच्या कार्यालयात जाऊन मतदान केले. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, निवडणुकीमध्ये जनतेमध्ये प्रचंड उत्साह असल्यामुळे ७० टक्क्यांवर मतदान होईल मला विश्वास आहे. काँग्रेसशी माझी लढत असून त्यात चांगल्या मताधिक्क्याने विजयी होईल, असा मला विश्वास आहे. आम आदमी पक्षाशी माझी लढत नाही. त्यांनी माझ्यावर किती आरोप केले असले तरी त्याचा मतदारांवर काही उपयोग होणार नाही. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून नागपुरात केलेली विकास कामामुळे लोकांचा विश्वास आहे त्या विश्वासातून लोक मतदान करीत आहेत. काँग्रेसत्या कार्यकाळात महागाई आणि भ्रष्टाचार वाढल्यामुळे जनतेचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल, असा मला विश्वास आहे.  नागपुरात नरेंद्र मोदी यांची सभा घ्यावी अशी परिस्थिती नव्हती शिवाय त्यांचे प्रचार सभा ठरल्या होत्या. नागपुरात जनतेचा वाढता प्रतिसाद बघता मोदीं यांची सभा घेतली नाही. मतदान आटोपल्यावर उद्या आराम करणार आहे. त्यानंतर १५ एप्रिलपर्यंत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. महाराष्ट्राचा दौरा आटोपल्यावर दिल्लीमध्ये जाईल. निवडणूक झाल्यानंतर दमानिया यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देणार का असे विचारले असता, दमानिया यांच्या आरोपात काही तथ्य नसल्याचे गडकरी यांनी सांगितले.

काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांनी कुटुंबासह शिवाजीनगरमधील महापालिका शाळेत मतदान केले. यावेळी बोलताना मुत्तेमवार म्हणाले, मला जिंकण्याचा पूर्ण विश्वास आहे. माझ्याविरोधात भाजपने अपप्रचार केला आहे. मात्र लोकांचा काँग्रेसवर विश्वास आहे. गडकरी प्रथमच निवडणूक लढवित असून मी सातवेळा खासदार झालो. यावेळीही माझा विजय निश्चित आहे.