जिल्ह्य़ातील भिवापूर पंचायत समिती व धर्मभारती नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पीस अँड व्हॅल्यू एज्युकेशन, केरळ यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. शाळेतील मुख्याध्यापकांकरिता शिक्षण समृद्धीकरण कार्यक्रम भिवापूर पंचायत समितीत आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद््घाटन स्वामी सच्चिातानंद भारती यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती कुंदा कंगाले उपस्थित होत्या. यावेळी मंचावर माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, जी.एस. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. उखळकर, केंद्रीय विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य एच.सी. कनेर, गटविकास अधिकारी एम.डी. बारापात्रे, गटशिक्षणाधिकारी जाधव, इन्स्टिटय़ूट ऑफ इन्टिग्रेटेड डेव्हलपमेंटचे डॉ. अशोक धाबेकर उपस्थित होते.
स्वामी सच्चितानंद भारती यांनी शिक्षण क्षेत्रात शिक्षणाचे परिवर्तनामधील योगदान व इतर संबंधित विषयावर मार्गदर्शन केले.या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यालयीन शिक्षकांची क्षमता, कौशल्य व गुणवत्ता वाढविण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे, असा विश्वास गटविकास अधिकारी मनोहर बारापात्रे यांनी व्यक्त केला. शिक्षण समृद्धीकरण कार्यक्रमात हरिभाऊ केदार यांनी शिक्षकांची समाजातील भूमिका आणि महत्त्व विशद केले. राज्यघटनेच्या अनुच्छेद ५ ‘अ’च्या चौकटीत देशहित साधल्या जाऊ शकते, असे ते म्हणाले.
सेवानिवृत्त प्राचार्य एम.सी. कानेर यांनी शिक्षणाची पंचसूत्री आणि त्याचा दैनंदिन जीवनात होणारा परिणाम यावर मार्गदर्शन केले.सभापती कुंदा कंगाले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविण्या यावे, असे मत व्यक्त केले. या कार्यशाळेत भिवापूर अंर्तगत जि.प. प्राथमिक शाळेतील १२५ शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. विस्तार अधिकारी लेदे, केंद्र परमुख देऊळकर, माटे, वाधे, ठाकेर, पोखळे यांनी मार्गदर्शन केले. केंद्र प्रमुख माळी यांनी आभार मानले.